असं रिकव्हर करा तुमचं हॅक झालेलं Facebook अकाउंट...
तुमचं Facebook अकाउंट हॅक झालयं, असं तुम्हाला वाटतं का ? किंवा दुसरं कोणीतरी तुमचे Facebook अकाउंट वापरतय ? जर तुम्हाला असं वाटत असेल, तर या पद्धतीने तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट रिकव्हर करू शकता आणि यासंबंधी तक्रार देखील करू शकता.
Hacked Facebook Account : तुमचं Facebook अकाउंट हॅक झालं आहे असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही सर्वप्रथम काय करायला हवं? तुमचं Facebook अकाउंट पुन्हा कसं वापरात आणायचं. हे सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर चिंता करु नका, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांवर कशी मात करायची ते सांगणार आहेत.
असं जाणून घ्या की, तुमचं अकाउंट हॅक झालं की नाही?
तुमचं फेसबूक अकाउंट हॅक झालं असेल तर, तुम्हाला तुमच्या पेजवर काही गोष्टी दिसतील ज्या तुम्ही कधीही पोस्ट करत नाही. स्पॅम मेसेज DM मध्ये दिसू लागले, चुकीचे फोटो किंवा व्हिडिओ जे तुम्ही पाठवले नाहीत. याशिवाय, तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे एक मेसेज देखील मिळेल की तुमचं अकाउंट एखाद्या अनोळखी ठिकाणावरून चालवलं जातंय. जसं की तुमचं अकाउंट दुसऱ्या देशातून किंवा राज्यातून अॅक्सेस केलं जातयं.
अकाउंट हॅक करताच, हॅकर्स सर्वातआधी तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदलतात. तरीही, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये एन्ट्री करू शकत असाल तर, सेटिंग्जमध्ये जा आणि तुमचं Facebook अकाउंट अलीकडे कुठे उघडलं आहे ते तपासा. तुमचं अकाउंट सर्वत्र लॉगआउट करा.
असं रिकव्हर करा तुमचं हॅक झालेलं Facebook अकाउंट...
1. फेसबुक खात्याचा पासवर्ड बदला. मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्हीवर पासवर्ड बदला.
2. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही लॉगिन खात्यातून लॉगआउट करा.
3. मोबाईलमधून संशयास्पद अॅप्लिकेशन काढून टाका.
फेसबुक अकाउंट हॅक झाल्यास तक्रार कशी करावी ?
तुमचं अकाउंट हॅक झाल्याचं तुम्हाला वाटत असल्यास, Facebook सपोर्टशी संपर्क साधा आणि त्यांनी दिलेल्या सुचनांचं पालन करा म्हणजे तुम्हाला तुमचं फेसबूक अकाउंट परत मिळेल.