Wrong UPI Payment Recovery Tips in Marathi: आजकाल सर्वजण ऑनलाईन पेमेंट करतात, तुम्हीही करत असालच... अनेकदा पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात. त्यावेळी काय करावं, सुचत नाही. मात्र, काळजी करू नका. काही प्रोसेस करून तुम्ही पैसे पुन्हा तुमच्या खात्यात रिफंड करू शकता. याची प्रक्रिया नेमकी कशी असते, जाणून घेऊया...


आपली चूक मान्य करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा पेमेंट केल्यावर आपण आपली चूक मान्य करत नाही. तुम्ही चुकीचं UPI पेमेंट केल्याचे समजताच त्वरित कारवाई करा. त्यामुळे तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.


तुम्ही ज्या खात्यात ट्रान्सफर करता, त्या खात्याचा मोबाईल नंबर किंवा बँक खातं क्रमांकासह व्यवहाराचे तपशील काळजीपूर्वक तपासून घ्या.


लगेच बँकेशी संपर्क करा


चुकीच्या UPI पेमेंटबद्दल बँकेला माहिती द्या आणि सर्व आवश्यक तपशील द्या आणि तक्रार नोंदवा. यामध्ये ट्रान्झॅक्शन आयडी, व्यवहाराची तारीख आणि वेळ, तसेच प्राप्तकर्त्याबद्दल तपशील द्यावा, यामुळे लवकरात लवकर पैसे तुम्हाला मिळू शकतात.


प्राप्तकर्त्याला विनंती करा


ज्या खात्यात पैसे गेले आहेत, त्या क्रमांकावर कॉल करून पहा. त्याला नम्रतेने बोला आणि पैसे रिफंडची मागणी करा. या परिस्थितीत पैसे पुन्हा येण्याची शक्यता असते.


बहुतेक UPI अॅपमध्ये अशा प्रकरणाचं निराकरण करण्यासाठी विशिष्ट नेटवर्क आहे. त्यावर संपर्क करून सर्व संबंधित व्यवहार तपशील द्या. तपासासाठी आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रे तयार ठेवा.


पुराव्याचे रेकॉर्ड ठेवा


जर बँकेच्या निर्णयावर तुमचं समाधान होत नसेल तर बँकांकडील समर्पित नोडल अधिकारी किंवा बँकिंग लोकपाल सेवा असतात, त्यांना संपर्क करू शकता. ईमेल, फोन कॉल्स आणि तक्रार संदर्भ क्रमांकांसह सर्व संपूर्ण पुराव्याचे रेकॉर्ड ठेवा आणि अपडेट घेत रहा. लवकरच तुम्हाला तुमचे पैसे रिफंड होतील.


आणखी वाचा - Mobile Battery Tips: उन्हाळ्यात तुमचाही मोबाईल हँग होतो, बंद पडतो का? जाणून घ्या यामागील कारणं आणि उपाय


दरम्यान, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही UPI वरून दररोज फक्त 1 लाखापर्यंतचा व्यवहार करता येतो. तर काही बँकेच्या मर्यादा देखील आहेत. छोट्या बँकांनी त्यांची मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. प्रत्येक बँकेने वेगवेगळ्या मर्यादा ठरवून दिल्यात, त्यामुळे तुमच्या बँकेच्या मर्यादेनुसार तुम्ही ट्रान्जॅक्शन करून शकतात.