Mobile Battery Tips: उन्हाळ्यात तुमचाही मोबाईल हँग होतो, बंद पडतो का? जाणून घ्या यामागील कारणं आणि उपाय

Summer Mobile Battery Charging Tips: अनेकदा उन्हाळ्यात फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असल्याचं पहायला मिळतं. अनेकांना हा अनुभव येतो. पण खरोखरच उन्हाळ्यात मोबाईलची बॅटरी लवकर संपते का? असं का होतं? नेमका हा प्रकार आहे तरी काय? जाणून घेऊयात...

| May 09, 2023, 16:42 PM IST
1/11

Summer Mobile Battery Charging Tips

फार ऊन आणि उन्हाळा अनेकांना आवडत नाहीत. अनेकदा तर अगदी काम असलं तरी घराबाहेर पडावसं वाटत नाही. उष्णतेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्याचप्रमाणे त्याचा परिणाम आपल्या मोबाईलवरही होतो.

2/11

Summer Mobile Battery Charging Tips

फार उष्णता असेल तर मोबाईलची बॅटरी खराब होते. मोबाईलच्या बॅटरीवर वातावरणातील उष्णतेचा परिणाम होतो हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.

3/11

Summer Mobile Battery Charging Tips

खरं तर जास्त उष्णता आणि जास्त थंडी दोन्ही गोष्टींचा मोबाईलच्या बॅटरीवर परिणाम होतो. एका अहवालानुसार जास्त थंडी असेल तर मोबाईलची बॅटरी लवकर संपते. मात्र उष्णतेमुळे मोबाईलच्या बॅटरीला कायमचं नुकसान होऊ शकतं. उष्णतेने मोबाईलची बॅटरी आणि पर्यायाने मोबाईल कायमचा डॅमेज होऊ शकतो.

4/11

Summer Mobile Battery Charging Tips

जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट हे 32 ते 95 डिग्री तापमानामध्ये काम करतात. सॅमसंग, गूगल, वनप्लस फोन्सच्या तापमानाची रेंजही साधारण हीच असते. 

5/11

Summer Mobile Battery Charging Tips

त्यामुळेच बाहेरील तापमान जास्त असेल तर फोन वापरताना अडचणी निर्माण होतात. अनेकदा फोन हँग होतो, बंद पडणं याबरोबरच बॅटरी पटापट संपण्याची समस्याही उद्भवते.

6/11

Summer Mobile Battery Charging Tips

आता या समस्येवरील उपाय म्हणजे घरातून बाहेर पडताना गरज नसेल तर मोबाईलचे अनावश्यक सेवा बंद करुन ठेवाव्यात. यामध्ये नोटीफिकेशन, लोकेशन सारख्या गोष्टींचा समावेश होतो.

7/11

Summer Mobile Battery Charging Tips

उन्हाळ्यात जास्त उष्ण तापमानाच्या प्रदेशात फिरत असाल तर मोबाईलवरुन फोटो पोस्ट करणे, गेम खेळणे यासारख्या गोष्टी टाळाव्यात. अर्थात बंद खोलीत किंवा रात्री मोबाईल वापरण्यास हरकत नाही. मात्र उन्हात मोबाईलचा वापर गरज असेल तरच करावा.

8/11

Summer Mobile Battery Charging Tips

फोनसाठी उत्तम तापमान कोणतं? अॅपल कंपनीच्या वेबसाईटवर यासंदर्भातील उल्लेख आढळतो. कंपनीने प्रोडक्ट हे भारतीय तापमान मापनानुसार 16 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये काम करण्यासाठी डिझाइन केले आहेत.

9/11

Summer Mobile Battery Charging Tips

सामान्यपणे कोणताही मोबाईल 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापामान असेल तर योग्य पद्धतीने काम करत नाही. भारतामध्ये उन्हाळ्यात तापमान हे साधारण या तापमानापेक्षा अधिकच असते. त्याचा थेट परिमाण मोबाईलच्या बॅटरीवर होतो. 

10/11

Summer Mobile Battery Charging Tips

फोन सातत्याने उष्ण तापमानात राहिल्यास त्याच्या बॅटरीवर परिणाम होऊन त्याची चार्जिंग होण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात फोन चार्ज करतानाही तो जास्त वेळ चार्जिंगला राहणार नाही याची काळजी घ्यावी.

11/11

Summer Mobile Battery Charging Tips

फोन जास्त वेळ चार्जिंग लावल्यास तो तापतो. त्यामुळेच मोबाईलचे कमीत कमी फंक्शन मोबाईल उन्हात वापरताना सुरु ठेवावेत हा सर्वात सोपा मार्ग आहे.