मुंबई : आजच्या घडीला WhatsApp या अॅपलिकेशनचा उपयोग सर्वाधिक करण्यात येत आहे. मॅसेज करण्यापासून व्हिडिओ कॉलपर्यंतचे सगळे फिचर्स या अॅपमध्ये  उपलब्ध आहेत. यूजर वाढवण्यासाठी WhatsApp कंपनी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येताना दिसते. दरम्यान या अॅपमध्ये आधीच काही असे महत्त्वाचे फिचर्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर फार कमी लोक करतात. काहींना या इनसाईड फिचर्सबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे हे फिचर्स वापरले जात नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WhatsApp या इंस्टेट मॅसेजिंग अॅपद्वारे वॉईज चॅट आणि व्हिडिओ कॉल करताना मोठ्या प्रमाणात डेटा वापरला जातो. त्यामुळे मोबाईल डेटाचा उपयोग  करणाऱ्यांसाठी ही एक मोठी समस्या बनते. त्यामुळे मोबाईल डेटा यूजर्सचा नेहमीच कल असतो की कमी मोबाईल डेटा वापरुन कशाप्रकारे जास्तीत जास्त ऑनलाईन राहता येईल.


यासाठी देखील WhatsApp मध्ये एक फिचर उपलब्ध आहे. या फिचरच्या सहाय्याने मोबाईल डेटाचा कमी वापर करुन आपण वॉईज चॅट आणि व्हिडिओ कॉल करु शकतो.जर तुम्ही WhatsApp वरुन वॉईज चॅट आणि व्हिडिओ कॉल जास्त प्रमाणात करता तर हे फिचर तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी आहे. याचा उपयोग कसा करावा हे  खाली सांगण्यात आलं आहे.


WhatsApp च्या या फिचरचा उपयोग कसा करावा?
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. यासाठी तुमच्या Android  फोनमध्ये या अॅपचं लेटेस्ट व्हर्जन 2.21.12.21 असणं गरजेचं आहे.आणि iOS डिव्हाईजमध्ये अॅपचं  2.21.130.15 व्हर्जन असणं देखील महत्त्वाचं  आहे. 


- या फिचरचा वापर करण्यासाठी सुरुवातीला तुमचं WhatsApp ओपन करा.
- त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- तुम्हाला Settings चा पर्याय दिसेल.
- आता Storage आणि Data वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या स्क्रिनवर Use Less Data for Calls असं ऑप्शन दिसेल, त्याला enable करा.



या काही सेकंदाच्या सिंपल स्टेप्समुळे तुमचा मोबाईल डेटा आता कमी प्रमाणात वापरला जाईल. Android आणि iOS दोन्हीसाठी हेच स्टेप्स फॉलो करायचे आहे.