मुंबई : आता पावसाळा सुरु आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिक वस्तुंची काळजी घावी लागते कारण ते, हवेतील ओलाव्यामुळे खराब होऊ लागतात. ऐवढंच नाही तर पावसाळ्यात आपला मोबाईल देखील जपला पाहिजे, कारण जर पावसात आपला मोबाईल भिजला, तर त्याच्या आत पाणी जाऊ शकतं, ज्यामुळे तुमचा मोबाईल बंद किंवा खराब देखील पडू शकतो. त्यामुळे यामध्ये कसं पाणी जाणार नाही याची काळजी घ्याच. परंतु जर मोबाईलमध्ये पाणी गेलं तर काय करायचं? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर तुम्ही खालील गोष्टींचा अवलंब करा. तुम्हाला नक्की फायदा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर जाणून घेऊ या की, फोनमध्ये पाणी गेल्यावर तुम्ही काय उपाय करु शकता.


एअर कंडिशन


जर स्मार्टफोनमध्ये थोडे पाणी गेले असेल, तर तुम्ही ते एअर कंडिशनरच्या खोलीत काही काळ सोडू शकता, प्रत्यक्षात काय होते की, एअर कंडिशनर खोलीतील ओलावा खेचतो आणि जे पाणी स्मार्टफोनमध्ये गेले आहे ते बाहेर पडते आणि फोन चांगला काम करु लागतो.


तांदळाचा डब्बा


कदाचित तुमच्यापैकी काहींना तांदळाच्या वापराबद्दल माहिती असेल. स्मार्टफोनमधील पाणी निघून गेल्यावर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन एका दिवसभर तांदळाच्या भांड्यात ठेवावा लागेल आणि त्यानंतर त्याचा वापर करा. असे केल्याने तुमच्या स्मार्टफोनमध्ये गेलेले पाणी बाहेर येते.


हा ऍप वापरा


जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी गेले असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून ब्लोअर ऍप डाऊनलोड करावे लागेल, खरे तर हे अॅप वापरून स्मार्टफोनमधून मोठा आवाज येतो आणि स्पीकरमध्ये गेलेले पाणी आपोआप बाहेर येते. बहुतेक लोकांना या पद्धतीबद्दल माहिती नाही. परंतु आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास ही ट्रीक वापरू शकता.


हे तर झालं फोन खराब झाल्यानंतर काय करायचं ते, परंतु फोन खराब होऊ नसेल, तर तुम्ही काय करु शकता हे जाणून घ्या.


- झिप लॉक कव्हर वापरून तुम्ही स्मार्टफोनला पाण्यापासून वाचवू शकता.


- स्मार्टफोनवरील स्पेशल लॅमिनेशनद्वारेही याला वॉटरप्रूफ ठेवता येते.


- स्मार्टफोनला पावसाच्या पाण्यापासून वाचवणारे ग्लास कव्हर्स देखील आजकाल बाजारात खूप ट्रेंड करत आहेत.


- सिलिकॉन कव्हर्स स्मार्टफोनच्या संवेदनशील भागांचे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत आणि ते खूप किफायतशीर देखील आहेत.


- आजकाल बाजारात अशा वॉटरप्रूफ बॅग्जही उपलब्ध आहेत ज्या आउटिंगच्या वेळी स्मार्टफोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवतात.