WhatsApp News : WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगातील 2 अब्ज लोक हे अ‍ॅपअ‍ॅप  वापरतात. आता लोकांना याची इतकी सवय झाली आहे की त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे त्यासंदर्भातील व्हिडीओ स्टेटसला शेअर करतात. कोणी दुखावलं, फसवलं तर तसा संदेश लिहितात. (how to see whatsapp status without knowing them seen easy tips and tricksm in marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


लोक आता एकमेकांशी बोलत नाहीत पण स्टेटस मात्र नक्की पाहतात. काहीवेळा दुसऱ्याचं स्टेटस पाहायचं असतं मात्र समोरच्याला समजून द्यायचं नसतं. यासाठी व्हाट्सअ‍ॅपने नवीन फिचर आणलं आहे. तुम्ही कोणत्याही यूजरचं स्टेटस पाहू शकता तेही त्या यूजरला माहिती न होता देता. 


स्टोरी किंवा स्टेटस 24 तास अ‍ॅक्टिव्ह राहते आणि त्यानंतर आपोआप डिलीट होते. ही सेटिंग नेमकी कशी करायची जाणून घ्या. तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा. वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन-बिंदू मेनूवर टॅप करा आणि सेटिंग्ज निवडा. Accounts मध्ये privacy  वर क्लिक करा. आता Read Receipts वर क्लिक करा, आता तुम्ही समोरच्या युजरला न समजता स्टेटस पाहू शकता.


दरम्यान, तुम्ही डाटा बंद करूनही स्टेटस पाहू शकता. फाइल मॅनेजर उघडा आणि इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन WhatsApp ला सिलेक्ट करून Media मध्ये जाऊन Status चा फोल्डर उघडा.