How to Track Lost Android Smartphone or Apple iPhone: सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. जो तो त्याच्या बजेटनुसार स्मार्टफोन विकत घेत असतो. तसेच स्मार्टफोन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून वापरतो. यावरून आपण स्मार्टफोनवर किती अवलंबून असतो याचा अंदाज येतो. आपले बँक तपशील, सर्व पासवर्ड, संपर्क आणि अनेक वैयक्तिक कागदपत्रे आणि फोटो, सर्वकाही आपल्या स्मार्टफोनमध्ये असते. त्यामुळे स्मार्टफोन हरवणे हानिकारक ठरू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स येऊ लागले आहेत. यामुळे फोन हरवला तर सहज सापडतो पण काही वेळा ते फीचर्स उपयोगी पडत नाहीत. आज आम्ही यासाठी अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. या स्टेप्स फॉलो करून स्मार्टफोन ट्रॅक करू शकता, मग तो iPhone असो किंवा Android स्मार्टफोन.


CEIR म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर... हे एक सरकारी पोर्टल असून दूरसंचार विभागाने सेट केले आहे. यावरून फोन सहजपणे ट्रॅक केला जाऊ शकतो. या वेबसाइटद्वारे, तुम्ही तक्रार नोंदवू शकता, फोन ट्रॅक करू शकता आणि सिम बदलल्यानंतरही तुम्ही फोनचा अॅक्सेस ब्लॉक करू शकता.


जर तुमचा स्मार्टफोन हरवला असेल तर सर्वप्रथम CEIR च्या वेबसाइटवर जा आणि येथे दिलेल्या 'Block' पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला मोबाईल नंबर, IMEI नंबर, स्मार्टफोनचे मॉडेल आणि इतर महत्वाची माहिती विचारली जाईल. 


या वेबसाइटवरून फोन ट्रॅक करण्यासाठी, तुमच्याकडे फोन हरवल्याचा पोलीस तक्रार क्रमांक असणे आवश्यक आहे. एफआयआर दाखल करताना दिला जाईल. अशा प्रकारे, आपण तपशील प्रविष्ट करून आपला फोन ट्रॅक करू शकता आणि एक्सेस ब्लॉक करून फोनचा वापर नियंत्रित करू शकता.