WhatsApp वर तुम्हालाही Meta AI चा लोगो दिसतोय? त्याचं नेमकं करायचं काय? समजून घ्या
WhatsApp वर Meta AI चं अपटेड आलं आहे. तुम्हालाही व्हॉट्सअपवर उजव्या बाजूला हे फिचर दिसत असेल. पण हे फिचर नेमकं वापरायचं कसं याबद्दल जाणून घ्या.
Meta ने नुकतंच आपल्या आर्टिफिशियल इंटेलीजेंस सिस्टम Meta AI ची घोषणा केली होती. हे फिचर लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता Mera AI सर्वसामान्य युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. WhatsApp वर हे नवं अपडेट आलं आहे. तुम्हालाही व्हॉट्सअपवर उजव्या बाजूला हे फिचर दिसत असेल. पण हे फिचर नेमकं वापरायचं कसं याबद्दल जाणून घ्या.
जर तुम्हाला तुमच्या इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअपवर Meta AI चा आयकॉन दिसत नसेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करु शकता. हे अपडेट असंही लवकरच सर्व युजर्सकडे पोहोचणार आहे. याची स्पर्धा OpenAI च्या ChatGPT, गुगल आणि Gemini शी असणार आहे.
Meta AI च्या मदतीने युजर्स अॅप बंद न करता AI असिस्टंचा वापर करु शकतात. युजर्स आपल्या गरजेप्रमाणे तिथे हवे ते प्रश्न विचारु शकतात. याच्या मदतीने युजर्स प्लॅन देखील आखू शकतात.
चॅटमध्ये अशाप्रकारे करु शकता वापर
Meta AI चा वापर करणं फारच सहज आहे. तुम्ही कोणत्याही चॅट म्हणजेच पर्सनल किंवा ग्रुप चॅटवर याचा वापर करु शकतात. यासाठी युजर्सला आपल्या चॅटमध्ये @Meta AI लिहावं लागेल. यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा सर्चिंग या गोष्टी करु शकता. पण युजर्सना आपलं व्हॉट्सअप यासाठी सुरु ठेवावं लागणार आहे.
Meta AI नेमकं काय काय करु शकतं?
Meta AI एक ट्रू व्हर्च्यूअल असिस्टंट आहे, जे तुमच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे. तुमच्या मनातील सर्व शंका येथे दूर होऊ शकतात. तुम्ही येथे पिकनिकची प्लॅनिंगही करु शकता. हे तुम्हाला सजेशन देऊ शकतं. इतकंच नाही तर कोडही लिहू शकतात. पण येथे तुम्हाला फक्त इंग्रजीतच उत्तरं मिळतील.
Meta AI ची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Google च्या Gemini शी असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही असंख्य प्रश्न विचारु शकता. याचा वापर करणं इतर प्लॅटफॉर्मसच्या तुलनेत फार सोपं आहे. हे चॅटबॉटच्या स्वरुपात आलं आहे. तुम्ही चॅटिंगमध्ये याचा वापर करु शकता.