मुंबई :  स्मार्टनेसच्या बाजारात स्कुलबॅगनेही एन्ट्री घेतली आहे. Huawei  कंपनी लवकरच लहान मुलांसाठी नवीन स्कुल बॅग लॉंच करणार आहे. ही स्कुलबॅग स्मार्ट स्कुलबॅग असेल. या स्कुलबॅगचे नाव Huawei 9µm Smart Positioning Children's Schoolbag असे निश्चित करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही काही साधारण बॅग नाही. कंपनीने या बॅगमध्ये स्मार्ट पोजिशनिंग फंक्शन दिले आहे. ज्याच्या मदतीने पालक आपल्या पाल्याचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस करू शकतील. याशिवाय या बॅगेत Beidou आणि 5CEP एक्यूरसी सोबतच जीपीएससारखे फंक्शन उपलब्ध आहेत.


हे प्रोडक्ट लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही. ही स्कुलबॅग अद्याप लॉंच करण्यात आलेली नाही. सध्या Vmall वर चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


बॅगची किंमत 699 युआन म्हणजे साधारण 8 हजार रुपये आहे. ही किंमत टेस्टिंग वेरिएंटची आहे. बाजारात आल्यानंतर या बॅगची किंमत आणखी वाढू शकते. तसेच कंपनीने या स्कुलबॅगचे अधिकृत लॉंचींसंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही.


स्कुलबॅग ऍप कंट्रोल आणि  Harmony OS कनेक्ट सपोर्टसह बनवण्यात आली आहे. 'Smart Life'ऍपसोबत बॅगला स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. 


आपला पाल्य शाळेत, शिकवणीत जात असेल तर त्याच्या ठिकाणाची माहिती पालकांना मिळत राहील. ही स्कुलबॅग त्या ठिकाणीसुद्धा उपयोगी ठरू शकते. जेथे स्मार्टवॉच किंवा स्मार्ट फोन घेऊन जाण्याची परवानगी नाही.