अॅपलला झटका देत ही कंपनी पोहोचली दुस-या क्रमांकावर
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीला जागतिक बाजारपेठेत मोठा झटका बसला आहे.
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध अॅपल कंपनीला जागतिक बाजारपेठेत मोठा झटका बसला आहे.
अमेरिकेची कंपनी अॅप्पल आपला नवा स्मार्टफोन म्हणजेच 'आयफोन ८' सप्टेंबर महिन्यात लॉन्च करणार आहे. मात्र, त्यापूर्वी चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी हुवाईने अॅप्पला एक जोरदार झटका दिला आहे.
हुवाई कंपनीने जुन आणि जुलै महिन्यात विक्रीच्या बाबतीत अॅपलला मागे टाकलं आहे. अॅपलला मागे टाकत हुवाई कंपनीने दुसऱ्या स्थानकावर झेप घेतली आहे. तर, दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी आजही पहिल्याच क्रमाकांवर आहे. हुवाई पूढे निघून गेल्याने अॅपल तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
रिसर्च फर्म काऊंटर पॉईंट (Counterpoint)च्या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की, विक्रीच्या बाबतीत ऑगस्ट महिन्यात चीनी कंपन्या चांगला परफॉर्मंस दाखवतील. कारण, चीनी स्मार्टफोन कंपन्यांचे शेअर्स बाजारात झपाट्याने वाढत आहेत.
काऊंटर पॉईटचे संचालक पीटर रिचर्जसन यांच्या मते, 'हे स्थान मिळविणं हुवाई कंपनीसाठी एक मोठं यश आहे. कंपनीने आपला बिझनेस खूपच वेगाने वाढविला आहे.'
काऊंटर पॉईंटचे असोसिएट डायरेक्टर तरुण पाठक यांच्या मते, स्मार्टफोन विक्रीत चीनी कंपन्यांचं योगदान आणि महत्व खूपच वाढत आहे. हे सॅमसंग आणि अॅपल सारख्या कंपन्यांना तगडी टक्कर देत आहे. चीनी कंपन्या केवळ विक्रीच्या बाबतीतच नाही तर चांगले फीचर्स उपलब्ध करुन देण्यातही आघाडीवर आहेत.