मुंबई : पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल, सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आणि अनेकांना हाच प्रश्न पडतोय, की या फोटोत असं काय आहे, की पतीने आपल्या पत्नीला हा फोटो पाहिल्यानंतर फारकत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही वरील फोटोत व्यवस्थित पाहा...यानंतरही तुमच्या लक्षात आलं नसेल, तर हा किस्सा ऐका, हा किस्सा किती खरा...किती खोटा...या बाबतीत साशंकता आहे. कारण हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, सिनेमाची स्टोरी लिहिल्यासारखा हा किस्सा असू शकतो...म्हणून हा किस्सा जास्त मनावर न घेता...एक मनोरंजन म्हणून घ्या. कारण पती-पत्नी यांच्यातील नातं अतिशय महत्वाचं असतं.


सोशल मीडियावरील किस्सा असा आहे...


या पत्नीचा पती लग्नानंतर काही दिवसांनी, ऑफिसच्या कामानिमित्ताने काही दिवस दुसऱ्या शहरात गेला होता. यानंतर तो पत्नीला सरप्राईझ देण्यासाठी अचानक परतला, तेव्हा त्याने पत्नीचा एक फोटोही काढला.


यानंतर त्याने काही दिवसांनी ऑफिसमध्ये पत्नीचा फोटो व्यवस्थित पाहिला आणि त्याला धक्काच बसला, नंतर त्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिली. या फोटो उजव्या बाजूला गादीखाली एका पुरूषाचा चेहरा तुम्हाला दिसत असेल. जेव्हा या पत्नीचा पती अचानक परतला तेव्हा पत्नीने आपल्या मित्राला गादीखाली लपवलं असावं, असा तो किस्सा आहे.


मात्र फोटोशॉ़पच्या मदतीने असे चेहरे लावून सोशल मीडियावर किस्से रंगवता येतात. यामुळे अशा किस्से हे गंमतीनेच घेतलेले बरे.