Hyundai Kia Car Recall : ऑटो क्षेत्रात दर दिवशी नवनवीन क्रांती घडताना दिसते. पण, अनेकदा हीच क्रांची काही संकटं ओढावण्यासही जबाबदार ठरते. सध्या असंच संकट ऑटो क्षेत्रात आणि त्यातही काही ठराविक कार कंपन्यांवर ओढावलं असून, या कार कंपन्यांनी त्यांचे लाखो मॉडेल परत मागवले आहेत. या कार कंपन्या आहेत किया आणि ह्युंडई. जाणून तुम्हालाही धक्का बसेल, कारण नुकतंच ह्युंडई आणि कियानं त्यांच्या तब्बल 35 लाख कार परत मागवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार युएसमध्ये अर्थात अमेरिकेत या लाखो कार परत घेण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. कारच्या इंजिनमध्ये आग लागण्याच्या संभाव्य धोक्यामुळं कंपन्यांकडून वाहनधारकांना कार घरापासून दूर पार्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. परत मागवलेल्या या कारमध्ये ह्युंडईची सँटा फे आणि कियाची सोरेंटो एसयुव्ही समाविष्य असून, 2010 ते 2019 मधील काही मॉडेलही समाविष्ट आहेत. 


एसोसिएटेड प्रेसच्या माहितीनुसार युएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कारमधील अँटी लॉक कंट्रोमुळं इंधन वाहून जाण्याचा धोका असून, त्यामुळं शॉक सर्किट होण्याचीही शक्यता असल्यामुळं जागच्या जागी उभी असणारी कारही पेट घेऊ शकते. 


कंपनीनं वाहनधारकांना सतर्क करत म्हटलं... 


कार कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार परत  मागवलेल्या कारमधील बिघडलेली यंत्रणा ऑथराइज डीलर्सकडून कोणत्याही शुल्काशिवाय बदलण्यात येणार आहे. किया डिलरशिपवर हे बदल 14 नोव्हेंबरपासून आणि ह्युंडईकडून कारमधील बदल 21 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहेत. 


प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार युएसमध्ये 21 आगीच्या घटना आणि 22 थर्मल इंसिडेंट्स ज्यामध्ये (धूर येणं, आग लागून यंत्र विरघळणं) अशा घटनांचा समावेश आहे. तर, कियाच्या कारमध्ये आग लागण्याच्या आणि काही भाग वितळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यानंतर कार कंपन्यांनी हे मॉडेल परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. 


दरम्यान, वाहनधारकांनी आता कार वापराव्यात की नाही हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर केलेला असतानाच ह्युंडईकडून अद्यापही कोणतीही दुखापत किंवा तत्सम घटना घडण्याचं वृत्त समोर आलं नसल्यामुळं वाहनधारक त्यांची वाहनं/ कार वापरु शकतात. पण, तरीही कोणताही चुकीचा प्रकार भविष्यात घडू नये याचसाठी कंपनीकडून काही उणिवा असणारी वाहनं परत मागवली जात आहेत.