मुंबई : ह्युंदाई (Hyundai) मोटर इंडिया २०१८ संपण्याआधी जुना स्टॉक संपवणार आहे. यासाठी कंपनीने आकर्षक ऑफर काढलेल्या आहेत. ज्यात वेगवेगळ्या कारच्या मॉडेलवर १ लाख ५० हजारापर्यंत सूट मिळतेय. जाणून घ्या, कोणत्या कारवर किती रूपयांचा डिस्काऊंट मिळतंय. जाणून घ्या कोणत्या कारवर किती डिस्काऊंट मिळतंय.


ह्युंदाई ईऑन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनी डीलर जवळचा जुना स्टॉक संपवण्यासाठी ईऑन  (Eon) वर ४० हजारांचा डिस्काऊंट देत आहे. तसेच १० हजार रूपयांचा अतिरिक्त बोनस देखील मिळणार आहे. या कारमध्ये ५६ हॉर्सपावरचं इंजीन आहे. हे इंजीन 0.8 लीटर पेट्रोलंच आहे, जे 69 एचपी पॉवर जनरेट करतं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी सूट आहे. जे एकूण ६५ हजारावर जाणारं आहे.


ह्युंदाई ग्रँड i10


ह्युंदाई ग्रँड i10 वर 75 हजार रूपयांचं डिस्काऊंट मिळतंय, कंपनीने या मॉडेलला अपग्रेड देखील केलं आहे. कंपनी यावर सरळ ५० हजार रूपयांचं डिस्काऊंट देत आहे. तसंच प्राईम टॅक्सी ग्रँड i10 वर ४० हजार रूपयांची सूट देत आहे. सरकारी कर्मचारी असाल, तरी अतिरिक्त सूट मिळून ७५ हजार रूपये होणार आहेत.


ह्युंदाई अक्‍सेंट


या मॉडेलवर ९० हजार रूपयांची सूट दिली जात आहे. एक्सचेंज बोनस ५४ हजार रूपयांचं डिस्काऊंट मिळतंय, तर ४० हजारांचं डिस्काऊंट वेगळं आहे.


ह्युंदाई i20 आणि i20 अॅक्टीव्ह


कंपनीच्या या मॉडेलवर ५० हजार रूपये डिस्काऊंट मिळतंय. २० हजार रूपयांच्या डायरेक्ट डिस्काऊंट सह ३० हजार रूपये एक्‍सचेंज बोनस देखील आहे.


ह्युंदाई वेरणा


ऑटोकारच्या बातमीनुसार या मॉडेलवर ४० हजार रूपये डिस्काऊंट आहे, ज्यात २० हजार रूपयांचा एक्सजेंज बोनस देखील आहे.


ह्युंदाई इलांट्रा


यावर ग्राहकांना १ लाख ३० हजाराची सूट आहे. यात एक्सचेंज बोनस ३० हजार रूपये सामिल आहे.


ह्युंदाई टस्कन


यावर कंपनी दीड लाख रूपयांची सूट देणार आहे. यात एक्सचेंज बोनस ३० हजार रूपये आहे.