आयडिया देखील देणार स्वस्तात फोन
आयडियाने स्वस्त फोन देण्याची तयारी सुरु केली आहे. रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आणल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आहे.
मुंबई : आयडियाने स्वस्त फोन देण्याची तयारी सुरु केली आहे. रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आणल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आहे.
आयडीया देखील फोनची किंमत कमी करण्यासाठी काम करत आहे, असं आयडीयाचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कपानिया यांनी म्हटलं आहे, आयडिया अवघ्या २५०० रूपयात फोन देण्याची तयारी करत आहे, मात्र फोनवर सबसिडी दिली जाणार नाही, हे देखील कंपनीने स्पष्ट केलं आहे.
आयडियाचा हा फोन कधीपर्यंत बाजारात येईल आणि त्याचे फीचर्स काय असतील, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या फोनवर सध्या काम सुरु असल्याची माहिती आयडियाने दिली आहे.
रिलायन्सने जिओने सर्वात आधी हा धमाका केला होता, आता आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.