मुंबई : कोरोनामुळे (Corona) सर्व सिनेमागृह (movie theaters) बंद आहेत. त्यामुळे सध्या ओटीटीचा (OTT) बाजार जोरात आहे. अनेक ओटीटीप्रेमी नेटफ्लिक्सचं  (Netflix) सबक्रिप्शन घेऊन विविध प्रकारच्या वेबसीरिज (Web Series) पाहत आहेत. अनेक वेळा आपण आपल्या मित्रांना किंवा ओळखीतल्या व्यक्तीसोबत नेटफ्लिक्सचं लॉगीन आयडी आणि पासवर्ड शेअर करतो. दरम्यान अनेकदा हाच आयडी आणि पासवर्ड तिसऱ्याच कोणा व्यक्तीच्या हाती लागतो. त्यामुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचं  Netflix प्रोफाईल लॉक कसं करायचं, याबाबत जाणून घेऊयात. (if 3rd person use your Netflix account know how to lock your profile) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Netflix प्रोफाईल लॉक कसं करायचं?


Netflix अकाउंट ओपन करा.


- त्यानंतर जे प्रोफाईल लॉक करायचंय ते सिलेक्ट करा.  


- प्रोफाईल सिलेक्ट केल्यावर टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.    


- यानंतर स्क्रोल डाऊन करा. त्यानंतर Profile & Parental Controls या ऑप्शनवर टॅप करा.  


- इथे प्रोफाईल लॉ करा.  


- यानंतर Netflix अकाउंटच पासवर्ड एंटर करा. 


- यानंतर  Require a PIN या चेक बॉक्सवर क्लिक करा.


- जर PIN रिक्वायरमेंट हा पर्याय वगळाचा असेल, तर बॉक्सला अनचेक करा.   


- नवा PIN जनरेट करण्यासाठी यूजर्सला 4 आकडी पासवर्ड टाकावा लागेल.  


- अनसपोर्टेड डीव्हाईसवर लॉगीन केल्यास  PIN टाकणं बंधनकारक असेल. 


- जेव्हा नव्याने प्रोफाई क्रिएट करताना पासवर्ड टाकणं आवश्यक असतं.


- हा पर्याय तेव्हाच दिसतो जेव्हा मेन अकाउंट  Profile Lock PIN केलेला असतो. 


- सर्व प्रोसेस पूर्ण केल्यावर Submit वर टॅप करा.