मुंबई : Epic Games, Steam, GOG Galaxy  आणि EA Origin सारख्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर गेमिंग खात्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हॅकर्स आता मालवेअर वापरत आहेत. ब्लडीस्टीलर ट्रोजन नावाचा हा मालवेअर, युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील वापरकर्त्यांना प्रभावित करत आहे. ब्लडीस्टीलर ट्रोजन मालवेअर वापरकर्त्यांची बँकिंग माहिती, पासवर्ड, फॉर्म, कुकीजमध्ये प्रवेश करत आहे. पण ते थांबवण्याचा एक मार्ग आहे जे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.


अशा प्रकारे डेटा चोरला जातो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लीपिंग कॉम्प्युटरच्या अहवालानुसार, ब्लडीस्टीलर ट्रोजन मालवेअर महिन्यांपासून वापरकर्त्यांना टार्गेट करतो, हे सुरक्षा फर्म कॅस्परस्कीच्या संशोधकांनी शोधून काढले.


सिक्युरिटी फर्मच्या मते, या मालवेअरला फक्त गेमच्या माध्यमातून टार्गेट करण्याच्या उद्देशाने बनवले गेले नाही, परंतु तरीही हे मालवेअर बहुतेक गेमिंग ऍप्सच्या माध्यमातूनच डार्क वेबवर विकली जाणारी माहिती गोळा करुन टार्गेट करतो.


ब्लडीस्टीलर ट्रोजनपासून सुरक्षित कसे राहावे?


बहुतेक वापरकर्त्यांची खाती हॅक करणे सोपे आहे कारण ते चुका करतात. अहवालानुसार, जेव्हा वापरकर्ते संशयास्पद अॅप्स किंवा फाइल्स डाउनलोड करतात तेव्हा त्याच्यासोबत असे घडते. ज्यामुळे ते स्वत:च स्वत:चे नुकसान करतात.


बहुतेक लोक गेम खेळण्यासाठी चीट कोड डाउनलोड करतात. या चीट फाइल्स अजिबात डाऊनलोड करू नका, कारण त्यामध्ये ब्लडीस्टीलर ट्रोजन सारखे मालवेअर असू शकतात.


ब्लडीस्टीलर ट्रोजनची वैशिष्ट्ये


संशोधकांनी कोडनेड ब्लडीस्टीलर ट्रोजन ब्राउझरमधून कुकीज, पासवर्ड, फॉर्म, बँक कार्ड तसेच पीसीमधील माहिती आणि स्क्रीनशॉट चोरण्यास सक्षम आहे, असे अहवालात म्हटले आहे. ट्रोजन बेथेस्डा, एपिक गेम्स, GOG, ओरिजिन, स्टीम, टेलीग्राम, वीमवर्ल्ड वापरणाऱ्या लोकांचा डाटा ते वापरू शकतात.


याव्यतिरिक्त, डेस्कटॉप, uTorrent क्लायंट आणि मेमरी लॉग मधील फायली देखील वापरकर्त्यांच्या उपकरणांमधून चोरल्या जाऊ शकतात.