मुंबई : WhatsApp हे जगाती अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे, एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी आणि एकमेकांबद्दल महिती घेण्याचे उत्तम पर्याय आहे. यामध्ये लोकांसाठी चॅटींग, फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सारखे अनेक पर्याय देखील उपलब्ध आहे. WhatsAppमुळे आपण आपले कुटुंब आणि जवळील व्यक्तीशी जोडलेले असतो. ज्यासाठी आपण आपल्या कुटुंबाती लोकांचा ग्रुप बनवतो जेथे आपल्याला सगळी माहिती मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ग्रुप फक्त कुटुंबातील सदस्यांचेच नाही तर तुमच्या कॉलजचे, ऑफिसचे किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. परंतु तुम्हाला असा देखील अनुभव आला असेल की, बऱ्याचदा तुम्हाला कोणत्या तरी भलत्याच ग्रुपमध्ये अ‍ॅड केले जाते, ज्यामधील कोणत्याही लोकांना तुम्ही ओळखत नाही.


काही वेळेला तुमच्या ओळखीतील काही लोकं वेगवेगळे ग्रुप बनवतात आणि तुम्हाला त्यात अ‍ॅड करतात. काही वेळेला अशा ग्रुपमधून स्वत:हून बाहेर पडणं देखीस आपल्याला बरोबर वाटत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला असं वाटत असतं की, असा कोणता तरी पर्याय असावा, जेणे करुन कोणीही उठ सुट मला कोणत्या ही ग्रुपमध्ये अ‍ॅड करणार नाही.


तर आज आम्ही तुम्हाला WhatsAppची अशी एक ट्रीक सांगणार आहोत की, ज्यामुळे तुम्ही या सगळ्यापासून वाचू शकता आणि यामुळे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकणार नाही.


हे करणं खुप सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्सना फॉलो करावे लागेल.


सगळ्यात पहिलं  व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन वरील बाजूला असलेल्या 3 डॉटवर क्लिक करा. त्यानंतर त्यातील सेटिंग ऑप्शनवर जाऊन प्रायवसी सेटिंगवर क्लिक करा. त्यात तुम्हाला ग्रुपवर क्लिक करावं लागेल.


तेथे तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील, Everyone, My Contact आणि My Contact Except. त्यातील Everyone पर्याय सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकतो, तर My Contact सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या Contact लिस्टमध्ये असलेले लोकंच तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकतात. My Contact Exceptमध्ये तुम्ही त्या लोकांना टाकु शकता जे तुम्हाला सारखे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करतात. जेणे करुन ते तुम्हाला पुन्हा कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकणार नाही.