हा २ हजाराचा फोन घेतला, तर तुम्हाला पॉवर बँकचीही गरज पडणार नाही
JIVI मोबाइल्सने भारतीय बाजारात JIVI N0606 प्लस मोबाइल लॉन्च केला आहे.
मुंबई : JIVI मोबाइल्सने भारतीय बाजारात JIVI N0606 प्लस मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाईलमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या मोबाईलची बॅटरी 5000 mAh इतकी आहे. विशेष बाब म्हणजे या मोबाईलची किंमत मात्र 1 हजार 699 रुपये आहे. या मोबाईलला 'बिग बॉस' म्हणूनही ओळखले जाते.
या मोबाईलचं स्पेसिफिकेशन पाहिलं, तर मोबाईलचा डिस्प्ले 2.8 इंच आहे. मोबाईलला की-पॅड देण्यात आलं आहे. बैटरी 5000 mAh इतकी आहे, जिच्या मदतीने मोबाईलला पावर बँकमध्ये रुपांतर करता येईल. जेव्हा या बॅटरीचा उपयोग पावर बँक म्हणून केला जातो, तेव्हा या बॅटरीने कोणताही स्मार्टफोन चार्ज करु शकतो.
या फोनमध्ये कॅमेरा देखील दिला आहे. याशिवाय एमपी 3-एमपी 4 म्युझिक प्लेअरची सोयही देण्यात आली आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे, ज्यामध्ये वायरलेस एफएम आणि टॉर्चची सुविधा देखील आहे. या फोनच्या सहाय्याने कंपनी स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.