आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड
IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे.
मुंबई : IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे. देशातील आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर दिसून येत आहे. (Income tax raid) मोबाईल कंपनी शाओमी, ओपो, वनप्लस या कंपन्यावर ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर प्राप्तीकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. (IT Raids Offices Of Top Chinese Smartphone Makers Including Xiaomi, OnePlus And Oppo )
भारतातील मोबाईल उत्पादक आणि वितरकांवर मोठ्या कारवाईचा एक भाग म्हणून आयकर विभागाने देशभरातील चिनी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांच्या कार्यालये आणि उत्पादन युनिट्सवर छापे टाकले आहेत. गुप्तचर संचालनालयाने दक्षिण भारतातील फॉक्सकॉन इंडियाचे युनिट, भारत एफआयएच आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या प्लांटची झडती घेण्यात आली आहे.
या स्मार्टफोन कंपन्यांवर उत्पन्नात लपवाछपवी करत कर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी मोबाईल कंपन्यांच्या 15 कार्यालयांवर धाड टाकली आहे. स्मार्टफोन उत्पादक कंपन्या असलेल्या शाओमी आणि ओपो या कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत.
या कंपन्यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्यानंतर मोबाईल कंपन्यांना धडकी बसली आहे. या कंपन्यांनी उत्पन्नात लपवाछपवी केली असून कर चोरी देखील केली असल्याची गोपनीय माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. त्यानंतर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. नुकतेच ईडीकडूनही या कंपन्यांवर छापे घालण्यात आले होते.