मुंबई :  रिलायन्सकडून २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात अनलिमिटेड डाटा आणि फ्री व्हॉइस कॉलिंग तसेच मसेजिंगची सुविधासह जिओ ४ जी सीम लॉन्च केला. यानंतर आतापर्यंत जिओची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. २०१८ मध्ये तर जिओने सर्वाधिक डाटा देणारी स्कीम दिली आहे. जिओकडून जास्तच जास्त स्पीड देण्यात यावा अशी अपेक्षा ग्राहकांची असते, यात जिओसह इतर कंपन्याही स्पीड देण्यात आघाडीवर आहेत. पण जिओ आर्थिक बाबतीत परवडतं असं ग्राहकांचं मत असल्याने, जिओला जास्त पसंती मिळतेय, पण त्या आधी जीओचा स्पीड वाढवण्यासाठी काही सोप्या सेटींग्ज नक्कीच तुमच्या फोनमध्ये कराव्या लागतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हापासून या सीमची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता या सीमच्या इंटरनेटचा स्पीड कमी होत आहे. नेटचा स्पीड कमी असल्याने तुम्ही वैतागले आहात का? तसे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 


असे बहुतांशी होते की तुम्ही नवीन सीम टाकला आणि त्याच्या सेंटिंगला जाऊन काही चेंज करावे लागते. पण तुमच्याकडे रिलायन्सचा जिओचे सीम कार्ड आहे आणि तुम्ही पुढील प्रकार करून पाहिला तर तुमच्या जिओचा स्पीड वाढू शकतो. 


फोनची सेटिंग चेंज करा... 


१) सर्वात प्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जा


२) सेटिंगमध्ये मोबाईल नेटवर्कच्या ऑप्शनला क्लिक करा. 


३) यात अनेक ऑप्शन दिसतील पण तुम्ही यातील एक्सेस पॉईंट नेम चेक करा


४) या तुम्हाला अनेक नाव दिसतील  यातील तुम्ही एपीएल (APN)सेलेक्ट करा 


५) फोननुसार यात थोडेफार बदल होऊ शकतात, पण फोन सेंटिंगमध्ये जाऊन तुम्हांला APN सिलेक्ट करायचे आहे. 


६) या शिवाय तुमच्या फोनमध्ये प्रिफर्ड नेटवर्क एलटीई असले पाहिजे. 


७) वेळोवेळी आपल्या फोनचे कॅशे क्लिअर करायला.