नवी दिल्ली : रिलायन्स जिओने स्मार्टफोन आणि स्वस्त दरात मोबाईल डाटा उपलब्ध करून दिल्याने 
टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ झाला होता. त्यानंतर इतर कंपन्यांनीदेखील त्यांचे दर कमी करण्यात आले आहेत.  


भारत अव्वल स्थानी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीती आयोगाच्या माहितीनुसार भारत दरमहा १५० कोटी गिगा बाईट्स मोबाईल डाटा वापरत आहे. हा दर जगातील सर्वोच्च दर आहे. त्यामुळे सध्या मोबाईल डाटा वापराच्या स्पर्धेत भारत अव्वल स्थानी आहे. 


 नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कांत यांच्यामते भारताचा मोबाईल डाटा वापर हा चीन आणि अमेरिका यांच्या युजर्सच्या वापराहूनही अधिक आहे. 
 



 अमिताभ कांत यांनी या माहितीचा मूळ स्त्रोत कोणता आहे याबाबत माहिती दिलेली नाही.