शेतकरी मित्रांनो, बिना क्लच आणि गिअर्सचं ट्रॅक्टर...५० टक्के इंधन बचतीचा दावा
या ट्रॅक्टरमध्ये सुमारे 2 डझन असे फीचर आहेत जे अद्याप या इंडस्ट्रीमध्ये लाँच झालेले नाहीत.
मुंबई : Proxecto ने भारताचे पहिले हाइब्रिड ट्रॅक्टर सुरू केले आहे, जे पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. या स्वयंचलित हाइब्रिड ट्रॅक्टरमध्ये बॅटरी देखील नाही. या ट्रॅक्टरमध्ये सुमारे 2 डझन असे फीचर आहेत जे अद्याप या इंडस्ट्रीमध्ये लाँच झालेले नाहीत. HAV tractor ला प्रथम नोव्हेंबर 2019 मध्ये जगातील सर्वात मोठ्या अॅग्रीटेक इव्हेंटमध्ये प्रदर्शित केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन जर्मनीमध्ये करण्यात आले होते आणि तेव्हापासून या ट्रॅक्टरची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
हे एकमेव हायब्रीड ट्रॅक्टर आहे, ज्यात बॅटरी नाही. हे डिझेल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकते. इंफ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर, त्याच ट्रॅक्टरला सहजपणे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. AWED तंत्रज्ञानामुळे, सर्व चाक इलेक्ट्रिक ड्राइव्ह, ज्यामुळे वाहन चालविणे अगदी सोपे होते. त्यात क्लच किंवा गियर नसते. यात केवळ फॉरवर्ड, न्युट्रल आणि रीव्हर्स करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
50% पर्यंत कमी इंधनाचा वापर
Diesel Hybrid S1 मॉडेलमध्ये पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा 28 टक्के कमी इंधन वापरला जातो. S 2 CNG हायब्रीड मॉडेलमध्ये सुमारे 50 टक्के कमी इंधन वापरला जातो. सध्या याची दोन प्रकार आहेत. याशिवाय सर्व चाकांत इंडिपेंडेंट सस्पेंशन देण्यात आले आहे. त्या शिवाय हाईट अडजस्टमेंट फीचर देखील आहे.
8.49 लाख पासून किंमत सुरु
कंपनी 10 वर्षांसाठी लिमिटेड प्रोडक्टची वॉरंटीही देत आहे. याशिवाय 2 प्रकारांमध्ये एसी सुविधा उपलब्ध आहे. कंपनीच्या वतीने असे म्हटले जाते की, बेस मॉडेल HAV S1 50HP ची किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर टॉप व्हेरिएंट एचएव्ही HAV S1+ 50HP ची किंमत 11.99 लाख रुपये असेल आणि यात एअर कंडिशनिंग केबिन असेल. या व्यतिरिक्त कंपनीने HAV S1 45HP ला देखील बाजारात आणले आहे आणि त्याची किंमत 8.49 लाख रुपये आहे.
30 मेपासून बुकिंग सुरू
सर्वात खास गोष्ट म्हणजे हा ट्रॅक्टर मेड इन इंडिया आहे. तसेच तो पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. कारण त्यामध्ये बॅटरी वापरलेली नाही. ट्रॅक्टर HAV S1 बाजारात विक्रीसाठी आली आहे. त्याचे बुकिंग 30 मेपासून सुरू होत आहे. बुकिंगची रक्कम 10 हजार रुपये आहे आणि ती रिफंडेबल देखील आहे. प्री-बुक केलेले एचएव्ही ट्रॅक्टरची डील्हिवरी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल.