मुंबई : स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारताचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार स्मार्टफोन मार्केटमध्ये भारतानं अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. स्वस्त हँडसेट आणि 4G स्मार्टफोनमुळे भारतामध्ये स्मार्टफोन मार्केट जोरात वाढत आहे. कॅनलिस अॅनालिस्टच्या रिपोर्टनुसार २०१७मध्ये भारतात ४ कोटी हँडसेट्सचा व्यापार झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये सध्या १०० मोबाईल ब्रॅण्ड आहेत. कॅनलिस अॅनालिस्टच्या रिपोर्टनुसार शाओमी हा ब्रॅण्ड एक उत्तम उदाहरण आहे. शाओमीनं ऑनलाईन ब्रॅण्ड मार्केटमधून आपली जागा मजबूत केली आहे. शाओमी स्वस्तातले स्मार्टफोन आणण्याच्या विचारात आहे. शाओमीचे स्मार्टफोन १५ ते २० हजार रुपयांमध्ये मिळत आहेत.


सॅमसंग, ओप्पो, व्हिवो हे ब्रॅण्डदेखील भारतीय मार्केटमध्ये मजबूत स्थितीमध्ये आहेत. पण शाओमी लवकरच सॅमसंगला पिछाडीवर टाकेल असा अंदाज आहे. भारतातलं ७५ टक्के मार्केटवर ५ कंपन्यांचा कब्जा आहे. यामध्ये सॅमसंग, शाओमी, व्हिवो, ओप्पो आणि लेनोवो यांचा समावेश आहे.