5 हजार एमएच बॅटरीचा सर्वांत स्वस्त Smartphone लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
फोन घेताय! निम्म्य़ा किंमतीत मिळतोय `हा` स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स माहितीय का?
मुंबई : देशभरात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. त्याचप्रमाणे आता हा नवीन स्मार्टफोन बाजारात लॉंच झाला आहे. या स्मार्टफोन बाबतची मुख्य बाब म्हणजे इतर ब्रॅंडेड स्मार्टफोनपेक्षा निम्म्य़ा किंमतीत हा स्मार्टफोन चांगेल फिचर्स देतोय.त्यामुळे तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
इन्फिनिक्सने (Infinix) देशात आपला बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Infinix Smart 6 HD असे या स्मार्टफोनचे नाव आहे. तर स्मार्ट 6 मालिकेतली ही नवीन आवृत्ती आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला या मालिकेत Smart 6 आणि Smart 6 Plus लॉन्च केले आहेत.
Infinix Smart 6 HD हा या मालिकेतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हा फोन सिंगल स्टोरेज पर्यायामध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यांना फीचर फोनवरून अँड्रॉइड फोनवर अपग्रेड करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
किंमत किती?
Infinix Smart 6 HD भारतात एकाच स्टोरेज पर्यायामध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी आहे. त्याची किंमत 6,799 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Aqua Sky, Force Black आणि Origin Blue या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
कुठे खरेदी करता येणार?
Infinix Smart 6 HD हा स्मार्टफोन 12 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टद्वारे केली जाईल.
फिचर्स काय?
6.6-इंचाची TFT LCD स्क्रीन
वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन HD+ रेझोल्यूशनसह येते.
रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल
स्मार्टफोनमध्ये क्वाड-कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर
हा चिपसेट PowerVR GE8320 GPU आणि
2GB RAM आणि 32GB इंटरनल मेमरी
मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार
हा स्मार्टफोन Android 11 Go Edition
Android आधारित XOS 7.6 वर देण्यात आला
८ मेगापिक्सेलचा सेन्सर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
5W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी
दरम्यान तुम्हाला बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.