पॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो ? जाणून घ्या !
पॅनकार्ड हे ओळखीचा पुरावा किंवा प्राप्तिकर खात्यातील नोंद यासाठीच वापरले जाते. त्यापलीकडे याबद्दल काहीच ठाऊक नसते. पण पॅनकार्डमधील प्रत्येक अक्षर आपल्या माहितीचे स्पष्टीकरण देतो.
नवी दिल्ली : पॅनकार्ड हे ओळखीचा पुरावा किंवा प्राप्तिकर खात्यातील नोंद यासाठीच वापरले जाते. त्यापलीकडे याबद्दल काहीच ठाऊक नसते. पण पॅनकार्डमधील प्रत्येक अक्षर आपल्या माहितीचे स्पष्टीकरण देतो. या नंबरमागे लपविलेली माहिती आवश्यक आहे, हे लक्षात ठेवून प्राप्तिकर विभाग प्रत्येक व्यक्तीस पॅनकार्ड देते. पॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो, जाणून घेवूया.
पॅनकार्डवरील पाचवे डिजिट काय दर्शवतो?
आपण पाहतो की, पॅनकार्डवर आपल्या नावासोबत जन्मतारीखही असते. तसेच पॅनकार्डवरील पाचव अक्षर आपले आडनाव दर्शवतो. महत्त्वाचे म्हणजे, त्यात धारकांचे शेवटचे नावच पाहिले जाते. प्राप्तिकर विभाग, कार्डधारकाचे आडनाव त्यांच्या डेटामध्ये ठेवतो. मात्र याची माहिती कार्डधारकांना देत नाही.
प्राप्तिकर विभागाच्या देखरेखीत
पॅनकार्ड नंबर ही १० आकड्यांची विशिष्ट संख्या आहे. प्राप्तिकर विभाग हा नंबर अशा व्यक्तीसाठी उपलब्ध करुन देतो, जे पॅनकार्डसाठी अर्ज करतात. एकदा पॅनकार्ड तयार झाल्यानंतर, त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागच्या पॅनकार्डशी जोडले जातात. यात टॅक्स आणि क्रेडिटकार्ड याही व्यवहारांची देखरेख केली जाते.
पॅनकार्डवरील क्रमांक आयकर विभाग निश्चित करतो
पॅनकार्डवरील पहिले ३ अक्षर इंग्रजीत असतात. यात AAAपासून ZZZपर्यंत कोणतही अक्षर असू शकते. सध्या चालू असलेल्या मालिकेनुसार हे ठरविले जाते. हा क्रमांक विभाग स्वतःप्रमाणेच ठरवतो. हे नंबर ०००१ पासून ९९९९ पर्यंत काहीही असू शकते पॅनकार्डमध्ये ४ नंबर असतात. पॅनकार्डवरील चौथा डिजिटदेखील इंग्रजीत असतो. परंतु ,चौथा डिजिट कार्डधारकाची स्थिती सांगते. यामध्ये हा चौथा अंक खालीलप्रमाणे असू शकतो...
P- सिंगल व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (व्यक्तीचा संघ)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंदु अविभाजित परिवार)
B- BOI (वैयक्तिक संस्था)
L- लोकल
J- न्यायधीश व्यक्ती
G- सरकारी