AC, फ्रिज, कूलर वापरुन देखील कमी येईल तुमचं विजेचं बिल, कसं ते जाणून घ्या
तुम्हाला देखील ही समस्या त्रास देत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील बिजेचं बिल कमी करु शकता.
मुंबई : बऱ्याच लोकांच्या घरी ही समस्या असते की, इलेक्ट्रिक वस्तु कमी असूनही किंवा त्याचा जास्त वापर होत नसुन देखील विजेचं बिल जास्त येतं. त्यांनी कितीही प्रयत्न केल तरी ते कमी होत नाही. ज्यामुळे लोक त्रस्त असतात. तुम्हाला देखील ही समस्या त्रास देत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील बिजेचं बिल कमी करु शकता.
आज आम्ही अशाच काही पद्धतींबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे दर महिन्याचे वीज बिल वाचवू शकता.
1. एलईडी बल्ब वापरा
जुने फिलामेंट बल्ब आणि CFL जास्त वीज वापरू शकतात. जर तुम्ही LED बल्ब घरी वापरायला सुरुवात केली, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या बिलामध्ये लक्षणीय घट दिसेल, जर या गोष्टीला नंबर्समध्ये कॅलक्युलेट करायचं असेल, तर 100-वॅटचा फिलामेंट बल्ब 10 तासात 1 युनिट बिल वापरतो, तर तोट 15 वॅट CFL 66.5 तासांत 1 युनिट वीज बिल वापरतो. LED बल्बबद्दल बोलायचे झाले तर, 9-वॅटचा एलईडी 111 तासांत एक युनिट वीज बिल वापरतो.
2. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करताना रेटिंग लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही फ्रीज, एसी सारखे उपकरण खरेदी करता, तेव्हा तुम्हाला रेटिंगची विशेष काळजी घ्यावी लागते. 5-स्टार उपकरणे खूप कमी वीज वापरतात. त्यांची किंमत जास्त असली तरी त्यामुळे वीज बिलात घट होते, ज्यामुळेच त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे ही उपकरणे खरेदी केलात तर त्याला खरेदी करण्यासाठी 4 ते 5 हजार जास्त जातील, परंतु तुम्हाला पुढे लाईफ लाँक बिल कमी येईल.
3. AC वापरताना Temprature
तुम्ही एसी वापरता तेव्हा त्याचे तापमान 24 डिग्री ठेवा. यामुळे तुमची खोलीही थंड राहते आणि तुमच्या खिशावर फारसा परिणाम होणार नाही. याशिवाय, तुम्ही त्यात टायमर देखील सेट करू शकता जेणेकरून खोली थंड झाल्यावर एसी आपोआप बंद होईल.
4. स्विच बंद करायला विसरू नका
असे बरेचदा घडते, जेव्हा आपण खोलीच्या बाहेर जातो तेव्हा लाईट, पंखा आणि एसी चालू ठेवतो. हे योग्य नाही. विजेची उपकरणे वापरात नसताना ती बंद करा. त्याला नुसतीच बंद करु नका, तर त्याचे मुख्स स्विच बंदज करा याच्या मदतीने तुम्ही विजेचा वापर कमी करू शकाल.
5. एकाधिक गॅझेट्ससाठी पॉवर स्ट्रिप
तुम्ही एकाच वेळी अनेक उपकरणे चालवत असाल तर पॉवर स्ट्रिप वापरा. याच्या मदतीने, जेव्हा या वस्तू वापरात नसतील, तेव्हा तुम्ही ते सर्व एकाच वेळी बंद करून फॅंटम एनर्जीचे नुकसान टाळू शकते.