Instagram Down in Marathi : सोशल मीडिया साइट्स इंस्टाग्राम (Instagram users) युजर्सची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशातच काल (22 मे 2023) रात्रीपासून इंस्टाग्रामची सर्व्हिस ठप्प (instagram service down) झाली आहे. परिणामी रात्रीपासून यूजर्स पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोस्टच जात नाही. तसेच इंस्टाग्राम लाईव्हही होत (instagram Live) नाही. त्याचबरोबर इतरांच्या मेसेजला केलेला रिप्लायही डिलिव्हर होत नाही. त्यामुळे काल रात्रीपासून जवळपास एक लाख 80 हजार यूजर्सने यासंदर्भात तक्रार केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Downdetector.com मते रविवारी (22 मे 2023) एक लाख 80 हजार वापरकर्त्यांनी इंस्टाग्राम विरोधात तक्रार केली आहे. यासंदर्भात मेटाच्या प्रवक्त्याने, ही समस्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल प्रवक्त्याने माफी मागितली आहे. कंपनीने आउटेजबद्दल अधिक तपशील उघड केला नाही. मात्र मेलचे उत्तर दिलं आहे. 


यापूर्वी 18 मे 2023  रोजी सकाळी इन्स्टाग्रामची सेवा डाउन झाली होती. त्यावेळीही मोठ्या संख्येने युजर्सने तक्रार केली होती. दरम्यान, भारताने अद्याप इन्स्टाग्राम डाऊन झाले नव्हते. फक्त 34 टक्के युजर्सवा लॉगिन कनेक्शन समस्या येत होती. मात्र याआधी इंस्टाग्राम जानेवारीमध्ये ही डाउन झाले होते. 


तर युजर्सच्या मते, त्यांना इन्स्टाग्राम अॅप वापरण्यास अडचणी येत आहे. यूजर्सना आधी इंटरनेटची समस्या जाणवत होती. पण नेट सर्व्हिस पद्धतशीरपणे सुरू होती. कारण मोबाईल मधील इतर अॅप्स सुरळीत सुरु होते. केवळ Instagram चावलवताना समस्या येत होत्या. परिणामी या यूजर्सनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार करण्यास सुरुवात केली. इंस्टाग्राम सेवा बंद झाल्याचा सार्वाधिक फटका अमेरिकेतील युजर्सना बसला आहे. Downdetector.com च्या मते, यूएसमधील 10 लाखांहून अधिक युजर्सने यासंदर्भात तक्रार केली आहे. तर ब्रिटनमधील 56 हजार आणि कॅनडातील 24 हजार युजर्सने तक्रार नोंदवली आहे. 


यापूर्वी जेव्हा नोव्हेंबर आणि सप्टेंबरमध्ये इंस्टाग्राम डाऊन होते तेव्हा संबंधित माहिती Instagram.com च्या माध्यमातून माहिती पुढे आली होती. आणि समस्या दूर झाल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली जात होती. तसेच याआधीही इंस्टाग्राम अनेक वेळा डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले होते. कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन होताच लगेच यूजर्सच्या ट्विटस आणि मीम्स पोस्टींगला सुरुवात होते. सकाळपासून युजर्सना इंस्टाग्राम रिफ्रेश करण्यातसुद्धा अडचणी येताय.