मुंबई : अनेक जण आता फेसबुकवरून इन्स्टाग्रामकडे वळले आहेत. काहींनी तर ट्वीटर आणि फेसबुक सोडून फक्त इन्स्टाग्राम वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरुणाईमध्ये इन्स्टाग्राम रिल्स आणि तिथल्या पोस्टची खूप जास्त क्रेझ आहे. मात्र इन्स्टाग्रामचं नवं फीचर खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. सध्या या कंपनीने टेस्टिंग सुरू केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामने सबस्क्रिप्शन फीचरची चाचणी सुरू केली आहे. हे फीचर जे पेड क्रिएटर्स आहेत त्यांना वापरायला मिळणार आहे. विशेष म्हणजे जर पेड नसेल तर तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकणार नाही. सध्या ही विशेष सोय 10 अमेरिकी क्रिएटर्सना या सुविधेचा लाभ घेता आला आहे. 


ज्यामध्ये बास्केटबॉल खेळाडू सेडोना प्रिंस मॉडल केल्सी कुक, अभिनेता-प्रभावकार एलन चिकिन चाउ, ओलंपिक जिमनास्ट जॉर्डन चिली आणि  डिजिटल निर्माता लोनी यांचा समावेश आहे. हे फीचर फक्त मेंबर्ससाठी असणार आहे. 


प्रत्येक महिन्याला द्यावे लागणार पैसे 


तयार केलेला कंटेन्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. साधारण 0.99 रुपये डॉलरपासून ते 99.99 डॉलर्स महिना एवढी रक्कम भरावी लागू शकते. आता नेमके कोणला पैसे द्यावे लागणार आणि का द्यावे लागणार हे जाणून घेऊया. 


तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. ज्याप्रमाणे युट्यूबची आहे त्याच पद्धतीनं आता इन्स्टाग्रामला देखील मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. ज्यांच्याकडे मेंबर्सशिप आहे त्यांनाच रिल्स किंवा व्हिडीओ पाहाता येणार आहेत. ज्यांच्याकडे मेंबर्सशिप नाही त्यांना पाहता येणार नाही.