instagram reels new feature:  इंस्टाग्रामवर रील म्हणुन टाकताना व्हिडिओचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा कमी असेल तर तो व्हिडीओ आतापर्यंत शेअर करता येत न्हवता माञ युझर्सना नव्या फिचरमुळे चांगलाच फायदा होणार आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकताना त्या व्हिडिओचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा कमी असेल तर तो रिल म्हणून शेअर करता येणार आहे. यासह फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना अ‌ॅपमध्ये  रिलसाठी टेम्पलेट्स मिळणार आहे. तसेच रिलमध्ये व्हिडिओवर टेक्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर पर्यायाचा देखील समावेश असणार आहे. येत्या आठवड्यात या नवीन फिचर्सचा समावेश होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामने एका ब्लॉगद्वारे हे स्पष्ट केलयं ,ज्या व्हिडिओचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा कमी आहे. ते येत्या आठवड्यात होणार्‍या बदलामुळे रिलवरही शेअर करता येणार आहे. आता इन्स्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तयार करण्यासाठी इमर्सिव्ह आणि इंटरेस्टिंग पर्याय असणार आहेत. तुमच्या व्हिडिओ पोस्ट लार्ज स्क्रीनवर पाहता येणार आहे. हे यातीलल वैशिष्ट्यस म्हणता येईल. या बदलापूर्वी पोस्ट केलेले व्हिडिओ हे रिलमध्ये काऊंट होणार नाहीत.


सद्या 90 सेकंदाची मर्यादा


सध्या, इन्स्टाग्रामवर 90 सेकंदांपेक्षा कमीचे व्हिडिओ रील म्हणून शेअर केले जातात. Instagram व्हिडिओ आणि Reels टॅब एकत्र करत आहे. . रिल्समधील बदलाच्या व्यतिरिक्त, इंस्टाग्राम रीमिक्ससाठी आणखी नवीन पर्याय आणत आहे. आता रील तयार करण्यासाठी ग्रीन स्क्रीन, होरीजॉन्टल किंवा व्हिर्टीकल स्प्लिट-स्क्रीन यासह विविध लेआउटमधून सोशल फोटोंमध्ये रिमिक्स करता येतील. युझर्सना  रीलमध्ये त्यांचे रिल जोडण्याचा पर्याय देखील असणार आहे.


नवीन टेम्पलेट्स


इंस्टाग्राम नवीन टेम्पलेट्स देखील देणार आहे. ऑडिओ क्लिप प्लेस होल्डर्स प्रीलोड करून फोटो किंवा व्हिडिओ क्लिप जोडून रील तयार करणे सोपे केली जाईल. हे टेम्प्लेट्स रोल आउट केल्यानंतर रील टॅबवरील कॅमेरा आयकॉनवर टॅप करून शोधले जाऊ शकतात. ड्युअल व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय देखील आहे. म्हणजे फ्रंन्ट आणि बॅक कॅमेऱ्यांमधून एकाच वेळी शुटींग करता येणार आहे.


त्यामुळे आता एकापेक्षा एक सुंदर रील्स बनवून तुम्ही अपलोड करू शकता आणि त्यामुळे तुमचे फॉलोवर्स मात्र नक्की वाढतील यात शंकाच नाही.