नवी दिल्ली : फोटो शेअरिंग सोशल मीडिया ऍप इन्स्टाग्रामने नुकतीच एक नवी सुविधा, नवं फिचर, इन्स्टाग्रामवर ऍड केलं आहे. या नव्या फिचरमुळे इन्स्टाग्राम युजर्स आपल्या पोस्टवर येणाऱ्या चांगल्या किंवा आवडत्या कमेंट्स पिन करु शकतात. यामुळे युजर फोटोवर आलेल्या चांगल्या कमेंट्स हायलाईट करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या फेसबुक आणि यू-ट्यूबवर पोस्ट पिन करण्याची सुविधा आहे. ट्विटरवरही युजर्स ट्विट पिन करु शकतात.


इन्स्टाग्रामने कमेंट्स पिन करण्याबाबतची घोषणा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे. कंपनीद्वारा करण्यात आलेल्या घोषणेनुसार, इन्स्टावर कमेंट्स पिन करण्याची सुविधा ऍन्ड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध असणार आहे. 


आयओएस युजर्सला कमेंटवर उजव्या बाजूला स्वाईप करुन पिन आयकॉनला सिलेक्ट करावं लागेल. तर ऍन्ड्रॉईडसाठी युजर्सला कमेंट अधिक वेळ प्रेस करुन ठेवावी लागेल, त्यानंतर पिन आयकॉन सिलेक्ट करावं लागेल. त्याशिवाय युजर्स कमेंट्सवर रिपोर्ट, कमेंट्स ब्लॉक करण्याचंही काम करु शकतात. 



इन्स्टाग्रामचं हे फिचर गेल्या काही दिवसांपासून टेस्टिंग केलं जात होतं. त्यानंतर हे फिचर मर्यादित युजर्ससाठीच देण्यात आलं होतं. परंतु आता इन्स्टाग्रामने हे फिचर सर्वच युजर्ससाठी जारी केलं आहे.