जिओनंतर या कंपनीने लाँच केलाय ७०० रुपयांत ४ जी फोन
इंटेक्सने मंगळवारी भारतात पहिला ४जी VoLTE फीचर फोन लाँच केलाय. जिओने स्वस्तात फीचर फोन लाँच केल्यानंतर इंटेक्सच्या या नव्या फोनची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : इंटेक्सने मंगळवारी भारतात पहिला ४जी VoLTE फीचर फोन लाँच केलाय. जिओने स्वस्तात फीचर फोन लाँच केल्यानंतर इंटेक्सच्या या नव्या फोनची घोषणा करण्यात आली.
नवरत्न सीरिजमध्ये अशा ८ फोन्सचा समावेश आहे. या फोनची किंमत ७०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत आहे.
इंटेक्स टर्बो+ ४जीमध्ये २.४ इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आलाय. हा फोन KaiOS सॉफ्टवेअरवर चालतो. यात ड्युअल कोर प्रोससरसह ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलाय. यात २ एमपी बॅक कॅमेरा तसेच VGA फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. यात 2000mAh बॅटरी देण्यात आलीये.
इंटेक्स टर्बो+ ४जी शिवाय इंटेक्सने आणखी तीन फीचर फोन इको सीरिजमधीलही लाँच केलेत. ECO 102+, ECO 106+, ECO सेल्फी असे हे तीन फोन आहेत. या तिन्ही फोनमध्ये १.८ इंचाचा डिस्प्ले, 800mAh ते 1800mAh पर्यंत बॅटरी , कॅमेरा आणि जीपीआरएस आहे.
टर्बो सीरिजमध्ये इंटेक्सने आणखी दोन फीचर फोनही लाँच केलेत. टर्बो शाईन आणि टर्बो सेल्फी१८ असे हे फोन आहेत. यात २.४ इंचाचा डिस्प्ले. टर्बो शाईनमध्ये २२ भारतीय भाषा, 1400mAh बॅटरी, वायरलेस एफएम आणि ३२ जीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी देण्यात आलीये. तर टर्बो सेल्फी १८ मध्ये 1800mAh बॅटरी आणि फ्रंट तसेच बॅक कॅमेराही देण्यात आलाय.
अल्ट्रा सीरिजमध्ये इंटेक्सने अल्ट्रा २४००+ आणि अल्ट्रा सेल्फी फीचर फोन आणलेत. यात डिस्प्ले अनुक्रमे २.४ इंच आणि २.८ इंच आहेत. यात बॅटरी अनुक्रमे 2400mAh आणि 3000mAh क्षमतेच्या आहेत.
यासोबतच इंटेक्सने लायन्स जी १० फीचर फोनही आणलाय ज्यात २.४ इंचाचा डिस्प्ले, कॅमेरा, 1450mAh बॅटरी आणि ६४ जीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी देण्यात आलीये.