Square Bicycle Wheels: सायकलचं चाक पंक्चर होणं आणि त्यानंतर उडालेला गोंधळ ही गोष्ट सध्याच्या नाहीतरी यापूर्वीची पिढीने म्हणजे 90's Kids ने कधी ना कधी अनुभवली असेलच. तसं चाक म्हटलं की गोलाकार आकारच डोळ्यासमोर येतो किंवा तसाच आपण विचार करतो. मात्र एका संशोधकाने सायकलला चक्क चौकोनी चाकं लावण्याची कल्पना काही काळापूर्वी मांडली होती. या चौकोनी चाकांवरुन इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता सेर्गी गॉर्डिएव्ह नावाच्या एका संशोधकाने चक्क त्रिकोणी चाकांच्या सायकलची संकल्पना मांडली आहे. सेर्गी गॉर्डिएव्हने त्याच्या 'द क्यू' नावाच्या युट्यूब चॅनेलवरुन यासंदर्भातील एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.


नेमकं हे प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साचेबद्ध विचारसणीहून वेगळ्या मात्र पूर्णपणे वापर करता येईल अशा संकल्पना मांडणारे संशोधक म्हणून सेर्गी गॉर्डिएव्ह यांची ओळख आहे. खास करुन सायकलबद्दलच्या सेर्गी गॉर्डिएव्ह यांच्या संकल्पाना आणि संशोधन चर्चेत असतात. त्यांनी बर्फावर चालणारी सायकलही बनवली आहे. तसेच जागातील सर्वात छोटी सायकल बनवण्यासाठीही त्यांनी मदत केली आहे. आता तर सेर्गी गॉर्डिएव्ह यांनी चक्क त्रिकोणी चाकं असलेल्या सायकलची संकल्पना मांडली असून हे पाहून त्यांचं काम फॉलो करणारे अनेकजण थक्क झाले आहेत. चौकोनी चाकांची जशी चर्चा झाली होती तशीच आता या त्रिकोणी चाकांची चर्चा सुरु झाली आहे. ट्वीटरवरुन काहींनी सेर्गी गॉर्डिएव्ह यांचं कौतुक केलं आहे तर काहींनी याची काय गरज असं म्हटलं आहे. 



सायकल चालणार कशी?


आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की त्रिकोणी चाकांची सायकल चालणार तरी कशी? तर ही चाकं बनवताना सेर्गी गॉर्डिएव्ह यांनी आपलं इंजिनियरिंगचं कौशल्य वापरलं आहे. ही त्रिकोणी चाकं रियुलो ट्रँगलच्या (Reuleaux Triangle Cycle Wheels) आकारात आहेत. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ही चाकं सरळ रेषेतील त्रिकोण नसून कोनांच्या इथे गोलाकार कडा ((Reuleaux Triangle) असलेली आहेत. "गोलाकार त्रिकोण त्यांची जाडी समान असेल. वर्तुळ सोडल्यास हा सर्वात सोपा आणि उत्तम आकार आहे," असं सांगितलं जातं. म्हणजेच अशा त्रिकोणी चाकांचा वापर करुन रस्त्यावर सायकल अधिक कार्यक्षमपणे चालवता येईल.



फक्त एकच अडचण


कोणत्याही सामान्य सायकलप्रमाणेच ही सायकल चालते. प्रथमदर्शनी ही सायकल चालणारच नाही असं तिच्या चाकांकडे पाहून वाटतं. मात्र प्रत्यक्षात ही सायकल फारच सहज चालवता येते. फक्त कोनांकडून फ्लॅट सर्फेस असलेल्या बाजूला चाक जमीनीला टेकलं की सायकलचा वेग वाढतो.