मुंबई: अमेरिकन टेक कंपनी Apple नवीन सीरिज ग्राहकांसाठी लाँच करत असते. प्रत्येक सीरिजचं खास वैशिष्ट्य असतं. Apple फक्त आपल्या कॅमेऱ्यासाठीच नाही तर सुरक्षेसाठी देखील खूप फेमस आहे. आता याच Apple कंपनीनं आपल्या iPhone 13 सीरिजमध्ये ग्राहकांसाठी खास फीचर आणण्याच्या तयारीमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा आपल्याला नेटवर्कची समस्या जाणवते. काहीवेळा नुसती रेंज असते मात्र फोन लागत नाही किंवा कनेटक्ट होण्याचा प्रॉब्लेम होत असतो. या सगळ्या समस्या लक्षात घेऊन आता थेट सॅटलाइट द्वारे कॉलिंगची सेवा देण्याचा विचार Apple कंपनी करत आहे. सध्या या फीचरवर काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच हे फीचर  iPhone 13 घेणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतं. 


मॅक रुमर्स यांच्या रिपोर्टनुसार जगात प्रसिद्ध असलेल्या Apple अॅनालिस्ट Ming Chi Kuo यांच्या मते iPhone 13 मध्ये सॅटलाईट कनेक्टिव्हिटी देऊ शकतात. यामध्ये जे ग्राहक हा फोन घेणार आहेत. त्यांना डायरेक्ट सॅटलाईट कॉलिंगची सुविधा मिळू शकते. 


iPhone 13 मध्ये सॅटलाईट कनेक्टिव्हिटी दिल्याने नेटवर्क असेल तरी आणि नसेल तरी तुम्ही कॉलिंग करू शकणार आहात. सॅटलाईट फोन्स साधारण स्मार्टफोनसारखे टेरेस्ट्रियल सेल साइट्स वापरत नाहीत. तिथे रेडियोचा वापर केला जातो. त्याच्याद्वारे सॅटलाईट कॉल्स केले जातात. याचा फायदा असा आहे की जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुमच्या फोनला नेटवर्क नसेल तरीही फोन लागू शकतात. 


आयफोनच्या 13 सीरिजमध्ये  iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 Mini असणार आहेत. 13 Pro Maxची किंमत सर्वात जास्त असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.