मुंबई: स्मार्टफोनसह जगातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ उत्पादनासाठी चीन वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे चीनमध्ये काही घडले का त्याचा थेट परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होतो. झपाट्याने वाढणाऱ्या तापमानानंतर चीनने एक निर्णय घेतला असून त्याचा थेट परिणाम टेक आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांवर होणार आहे. याच परिणाम iPhone 14 वर होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Apple चे फोन भारतात पहिल्यांदाच बनवले जाणार


 Apple चे हाय एंड फोन भारतात बनवले जातील आणि ते येथूनच बाहेर देखील पाठवले जातील. Apple ने अधिकृतपणे याची घोषणा केलीली नाही. आतापर्यंत, चेन्नईतील फॉक्सकॉन प्लांटमध्ये भारतात फक्त iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 चे उत्पादन केले गेले आहे. जर हा दावा खरा ठरला, तर आयफोन निर्माता फॉक्सकॉन प्रथमच भारत आणि चीन या दोन्ही देशांमधून आयफोन 14 ची शिपिंग सुरू करेल. 


दरम्यान चीन सध्या सर्वात भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. अहवालानुसार, अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला असून वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे.  सिचुआनमधील अनेक मोठ्या कंपन्यांना उष्णतेच्या लाटेमुळे वीज टंचाईमुळे बंद करावे लागले आहे. चीनने सिचुआन प्रांतातील अनेक मोठ्या कंपन्या 6 दिवसांसाठी बंद केल्या असल्याची माहिती मिळत आहे. या कंपन्यांच्या यादीत जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार बॅटरी उत्पादक कंटेम्पररी अँपेरेक्स टेक्नॉलॉजी कं. लिमिटेड (CATL) देखील समावेश आहे.
 
चीन हे केवळ टेक आणि ऑटो कंपन्यांसाठीच नाही तर सेमीकंडक्टर आणि सोलर पॅनल उद्योगासाठीही खूप महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिक कार आणि स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये लिथियमचा वापर केला जातो. यामध्ये काही लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे लिथियमचा पुरवठा कमी होईल. तथापि, फॉक्सकॉनला असे वाटत नाही. फॉक्सकॉन अॅपलचा प्रमुख पुरवठादार आहे. कंपनी या कारखान्यात आयपॅड बनवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत iPhone 14 लाँच करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, बंदिवास फक्त काही दिवसांसाठी आहे, त्यामुळे इतर गोष्टींवर फारसा परिणाम होणार नाही असे मत व्यक्त केले जात आहे.