मुंबई : आयफोन आपल्याकडेही असावा असं अनेकांना वाटतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट्स सिम्बॉल समजला जाणारा हा फोन सध्या खूपच चर्चेत आहे. लाखभर किंमत असलेला आयफोन 10 बाजारात आला आहे. मात्र तायवान आणि जपानमध्ये मात्र आयफोन ८ फुटल्याची माहिती मिळाली आहे. 


द सन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका कस्टमरचा पाच दिवस वापरल्यानंतर  iPhone 8 Plus हा फोन फुटला.  बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा कस्टमरने केला आहे. तर एका कस्टमरचा फोन बॉक्स उघडल्यानंतर त्याला फोनचे दोन पार्ट दिसले.  


एकापाठोपाठ दोन घटना झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती अ‍ॅपलकडून देण्यात आली आहे. अ‍ॅपलमध्ये यापूर्वीही काही फोनमध्ये बॅटरी फुटल्याचा प्रकर  घडला होता. मात्र क्वचित काही सदोष बॅटरींमध्ये असे प्रकार घडत असल्याची माहिती आहे. अ‍ॅपलप्रमाणे सॅमसंग फोनमध्येही हा प्रकार घडला होता. त्यानंतर Galaxy Note 7 ची निर्मिती थांबवण्यात आली होती.