या तारखेला लाँच होणार `आयफोन 8`
सॅमसंगने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर गॅझेटप्रेमी `आयफोन 8` कधी लाँच होणार याची वाट पाहत आहेत. पण, आता तुम्हाला `आयफोन 8` साठी जास्त वाट पहावी लागणार नाहीये.
मुंबई : सॅमसंगने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर गॅझेटप्रेमी 'आयफोन 8' कधी लाँच होणार याची वाट पाहत आहेत. पण, आता तुम्हाला 'आयफोन 8' साठी जास्त वाट पहावी लागणार नाहीये.
अॅप्पल आपला 'आयफोन 8' हा स्मार्टफोन वर्षाच्या शेवटपर्यंत लाँच करणार असल्याचं वृत्त एका वेबसाईटने दिलं आहे.
या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अॅप्पल आपले 'आयफोन 7s', 'आयफोन 7s प्लस' आणि 'आयफोन 8' हे स्मार्टफोन्स १२ सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. फोन लाँच झाल्यानंतर एका आठवड्यात हे फोन्स विक्रीसाठीही उपलब्ध होतील.
मात्र, यासंदर्भात अॅपलकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. या लाँचिंग दरम्यान, iOS 11, macOS हाय सिएरा, वॉच OS 4 आणि tvOS11 हे सुद्धा लाँच केले जाऊ शकतात. अॅप्पलच्या 'आयफोन 8' मध्ये फेस सेंसर लॉक आणि इंडक्टिव्ह चार्जिंग सारखे दमदार फिचर्स असणार आहेत.