iPhone Black Dark: आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. काहीजण टिकाऊ म्हणून आयफोन वापरतात तर अनेकजण स्टेटस सिम्बॉल म्हणून आयफोनचा वापर करतात. आयफोन वेळोवेळी काही ना काही अपडेट आणत असतो. या अपडेटसोबत आयफोनची किंमतही वाढते. पण त्यासोबत ग्राहकांची संख्यादेखील वाढते. दरम्यान आयफोन युजर्सना त्याबद्दलच्या अनेक गोष्टी माहिती नसतात. त्यातील एक म्हणजे आयफोनच्या मागच्या बाजूस कॅमेराजवळ असलेला ब्लॅक डॉट. फोटोत दाखवलेला ब्लॅक डॉट पुन्हा पाहा. तुम्ही याला आतापर्यंत एखादा कॅमेरा समजत आला आहात का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोनच्या मागच्या बाजुला असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ काळा ठिपका असतो. ज्यालाअनेकजण 'ब्लॅक डॉट' म्हणतात. . हा ब्लॅक डॉट काय आहे? तो कशासाठी उपयोगी येतो? याबद्दल अनेक आयफोन युजर्सनाही माहिती नसेल. याबद्दल जाणून घेऊया. 


नॉईस कॅन्सलेशन 


हा मायक्रोफोन आजुबाजूचा आवाज उचलतो. नंतर त्याला प्राथमिक ऑडिओपासून वेगळे करतो. हे नंतर नॉइज कॅन्सलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अवांतर आवाज कमी करते. ज्यामुळे तुम्हाला कॉलवेळी चांगल्या आवाजाची गुणवत्ता मिळते.


लोकल ऑडिओ


या मायक्रोफोनमध्ये लोकल ऑडिओ नावाचे फिचर आहे.  तुमच्या आयफोनच्या स्पीकरमधील आवाज तुमच्या डोक्याभोवती 3D प्रभावामध्ये फिरतो. चित्रपट पाहताना किंवा म्युझिक ऐकताना खूप चांगला अनुभव येतो.


व्हिडिओ रेकॉर्डिंग


हा मायक्रोफोन व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान ऑडिओ कॅप्चर करण्यास देखील मदत करतो. यामुळे उच्च दर्जाचा ऑडिओ मिळतो. यामुळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे व्हिडीओचा आनंद घेता येतो.  


"हे सिरी" व्हॉइस असिस्टंट


हा मायक्रोफोन 'हे सिरी' व्हॉईस असिस्टंट अॅक्टीव्ह करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमचा आवाज वापरून कॉल करण्यासाठी, म्युझिक प्ले करण्यासाठी, अलार्म सेट करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी तुम्ही 'Hey Siri' म्हणू शकता.


'ब्लॅक डॉट' हा केवळ मायक्रोफोनमधील एक छिद्र आहे हा कॅमेरा नाही. आयफोनमध्ये देण्यात आलेला हा एक्स्ट्रा कॅमेरा आहे, असे अनेकांना वाटते. पण हे खरे नाही.


निष्कर्ष


आयफोनमध्ये असलेला 'ब्लॅक डॉट' हा मायक्रोफोनचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो नॉइस कॅन्सलेशन, लोकल ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि "हे सिरी" व्हॉइस असिस्टंट यासारख्या अनेक फिचर्स चालवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. अनेक आयफोन युजर्सना या ब्लॅक डॉटबद्दल माहिती देखील नसते. पण त्याचे कार्य महत्वाचे आहे. ज्यामुळे लोक त्यांचा आयफोन अगदी आरामात वापरू शकतात. तुमच्या आयफोन युजर्स मित्रांना ब्लॅक डॉटबद्दल विचारा. त्यांना याबद्दल काही माहिती आहे का ते पहा. अन्यथा ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.