iPhone Camera Black Dot Feature and process to use it: भारतासह जगभरात आयफोनला खूप पसंती दिली जाते. आयफोन 14 सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींमध्ये या फोनची उत्सुकता आहे. आयफोन महागडा असल्याने स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं.  आतापर्यंत आयफोन 13 पर्यंत सीरिज उपलब्ध आहे. आयफोनचे डिझाईनही खूप वेगळे आहे. तसेच आयफोन युजर्संना यापैकी काही फीचर्सची माहितीही नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका फिचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्‍या मदतीने तुमच्‍या लाखो रुपयांचे काम फुकटात करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोनच्या टॉप मॉडेल्समध्ये तुम्हाला कॅमेरा सेटअप जवळ एक काळ्या रंगाचा डॉट दिसतो. आपल्या तो कॅमेरासारखा दिसतो. पण तसं नाही,  ब्लॅक डॉट कॅमेरापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करते. वास्तविक हा काळा डॉट प्रत्यक्षात 3D स्कॅनर आहे. 3D स्कॅनर विविध व्यवसायांमध्ये वापरले जाते. त्याचा सर्वसामान्यांना तसा उपयोग होत नाही. पण काही लोकांना त्याची रोज गरज भासते. हे फिचर डिझायनर आणि शिल्प बनवणार्‍या लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. ब्लॅक डॉट डिझाईन्स किंवा मॉडेल्स 3D मध्ये स्कॅन करू शकते आणि त्याची 3D प्रतिमा तयार करू शकते.


3D स्कॅनर कसं काम करते


एका खास अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही हे फीचर वापरू शकता. तुम्ही एकदा अ‍ॅप डाऊनलोड केलं की, जी वस्तू तुम्हाला स्कॅन करायची आहे, तिचा आकार सर्व बाजूंनी हळू हळू स्कॅन करा. तुम्ही व्हिडीओ बनवता त्याच पद्धतीने स्कॅन करायचं आहे.  त्या आकाराची 3D प्रतिमा आयफोनमध्ये सेव्ह केली जाते. साधारणपणे हे काम बाहेर केल्यास लाखो रुपये खर्च करावे लागतात.