iPhone SE 4 : Apple ने नुकतंच त्यांची iPhone 14 सीरीज लाँच केली होती. यानंतर आता आयफोनचे चाहते पुढच्या फोनची आतुरतेने वाट पाहतायत. अपकमिंग iPhone 15 आणि iPhone SE 4 च्या बाबतीत अफवा आणि लीक सुरु झाल्या आहेत. दरम्यान नुकत्या हाती आलेल्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 ची लाँच डेट, डिझाईन आणि इतर फीचरची माहिती समोर आली आहे.


कधी लाँच होणार iPhone SE 4 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेक्स्ट जनरेशन iPhone SE म्हणजेच iPhone SE 4 2024 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय 2023 मध्ये अॅपल iPhone 15 सिरीज लॉन्च करणार असल्याची देखील चर्चा आहे.


iPhone SE 4 चं डिझाइन


iPhone SE 3 च्या तुलनेत iPhone SE 4 चं डिझाइन वेगळं असण्याची शक्यता आहे. iPhone SE थर्ड जनरेशन 4.7 इंच डिस्प्ले, जाड bezels आणि टच आयडी होम बटन असलेला एकमेव आयफोन आहे.


दरम्यान समोर आलेल्या अफवांनुसार, Apple iPhone SE 4 सह नवीन डिझाइनची योजना आखलीये. MacRumors मधील एका अहवालानुसार, Apple होम बटणाशिवाय, Apple च्या फ्लॅगशिप्सप्रमाणे फोन पूर्ण डिस्प्ले डिझाइनसह असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे iPhone SE 4 2018 iPhone XR सारखा दिसण्याची शक्यता आहे. 


iPhone SE 4 डिस्प्ले


iPhone SE 4 मध्ये iPhone SE 3 च्या तुलनेत मोठी स्क्रीन असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौथ्या सिरीजच्या iPhone SE ला 5.7 आणि 6.1-इंचाची स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.