मुंबई : ऑनलाईन बँकिंग आता भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. लोक मोठ्या-मोठ्या व्यवहारांपासून ते अगदी छोट्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. सुरूवातीला लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT चा वापर करायचे. मात्र आता गुगलपे, फोन पे, BHIM UPI सारख्या पर्यायांमुळे UPI चा वापर करु लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसे पाहाता या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु या दोघांपैकी कोणते वैशिष्ट्य वापरणे जास्त चांगले आणि फायद्याचे आहे? असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत.


UPI मोठ्या प्रमाणात वापरला जातो


UPI ने खूप कमी वेळात संपूर्ण मार्केट कॅप्चर केलं आहे. म्हणजेच आपल्या जवळजवळ सगळ्याच लोकांकडे हे पाहायला मिळत आहे. कॅशलेस पेमेंटमधील या सुविधेचे लोकांनी खूप कौतुक केले. याचे कारण असे की लोक मोबाईलच्या मदतीने फार कमी वेळात यामुळे पेमेंट करु शकतात.


यासाठी तुम्हाला फक्त upi सपोर्ट करणारे अॅप हवे आहे. तुम्हाला UPI वर अनेक प्रकारचे बिल पेमेंट पर्याय देखील मिळतात. तर दुसरीकडे, NEFT द्वारे, तुम्हाला MENUALLY खाते क्रमांक आणि इतर माहिती प्रविष्ट करून पैसे समोरच्याला द्यावे लागतात.


तसेच जर तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एक जरी माहिती समोरच्याकडे असेल तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येणार आहे.


UPI चे फायदे


जिथे तुम्ही फक्त NEFT द्वारे पैसे पाठवू शकता, UPI तुम्हाला पैसे मिळवणे आणि देण्याची दोन्ही सुविधा मिळतात. इथे तुम्हाला जास्त माहिती देण्याची गरज नाही. थोड्या माहितीने आणि एका क्लिकवर तुम्हाला पैसे पाठवता येतात. यासाठी, प्राप्त करणार्‍या व्यक्तीकडे UPI खाते असणे देखील आवश्यक नाही.


परंतु समोरील व्यक्तीचे खाते फक्त मोबाईल क्रमांकाशी नोंदणीकृत असावे. तुम्ही नोंदणीकृत क्रमांकावर UPI करताच, पैसे थेट खात्यात जातात. परंतु तेट  NEFT करण्यासाठी तुम्हाला अनेक तपशील द्यावे लागतील आणि ही प्रक्रियाही थोडी लांबलचक देखील आहे.


UPI द्वारे एक दिवसाच्या व्यवहाराची मर्यादा देखील आहे. मात्र बँकेकडून त्यात वाढ करता येईल.


NEFT चे फायदे


लहान फंडांसाठी UPI हा एक उत्तम उपाय आहे, परंतु मोठ्या निधीच्या व्यवहारांसाठी NEFT अतिशय सुरक्षित मानला जातो. येथे कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता नाही. तसेच येथे निधी हस्तांतरणास 12 तास लागू शकतात. येथे तुम्हाला वन-क्लिक पेमेंट न करण्याचाही फायदा मिळेल.


येथे पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही सर्व माहिती भरा आणि नीट तपासा. अशावेळी केलेला व्यवहार बर्‍याच प्रमाणात सुरक्षित असतो. पैसे हस्तांतरित झाल्यानंतर, दोन्ही पक्षांना मेसेज देखील येतो, ज्यामुळे तुमच्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आलेत हे कन्फर्म होते.