Fact Check । whatsapp वर तो फिरणारा मेसेज खरा की खोटा?
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. whatsapp वर उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, असा मेसेज आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (whatsapp viral message) एक मेसेज फिरत आहे. whatsapp वर उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, असा मेसेज आहे. मात्र, हा मेसेच फेक आहे. यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले आहे.
सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज दिशाभूल करणारा आहे. सोशल मीडिया हा आपला अधिकार आहे, त्यावर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवत नाही. पण सामाजिक वातावरण दूषित करणारा अथवा समाजात तेढ निर्माण करणारा चुकीचा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
हा मेेसेज व्हायरल होत आहे?
whatsapp वर उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या संदेशात म्हटले आहे,
उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील
०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.
०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.
०३. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.
०४. ज्यांना माहित नाही अशा सर्वांना कळवा.
०५. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.
०६. कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घ्या.
०७. आपल्या मुलांना, भाऊ, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या सर्वांना माहिती द्या की आपण त्यांची काळजी
घ्यावी आणि क्वचितच सोशल साइट्स चालवा.
०८. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट
किंवा व्हिडिओ.. इ. पाठवू नका. ०९. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे … असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
१०. पोलिस अधिसूचना काढतील… त्यानंतर सायबर क्राइम… त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.
११. कृपया तुम्ही सर्व, गट सदस्य, प्रशासक, … कृपया या विषयाचा विचार करा. १२. चुकीचा संदेश पाठवू नका याची खबरदारी घ्या आणि सर्वांना माहिती द्या आणि या विषयाची काळजी
घ्या.
१३. कृपया हे सामायिक करा.”
मात्र, अशा मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये. हा मेसेज दिशाभूल करणारा आहे. whatsapp वर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवत नाही. हा मेसेज समाजात तेढ निर्माण करणारा चुकीचा आहे. त्यामुळे असा येणारा मेसेज पुढे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.