तुमचं अॅन्ड्रॉईड सुरक्षित आहे का? अशी करा खात्री...
तुम्ही जर अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल... तर तुमचा मोबाईल सुरक्षित आहे किंवा नाही असा प्रश्न तुम्हाला अनेकदा सतावत असेल. त्यासाठी गुगलचा एक ऑप्शन सध्या उपलब्ध आहे.
मुंबई : तुम्ही जर अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल... तर तुमचा मोबाईल सुरक्षित आहे किंवा नाही असा प्रश्न तुम्हाला अनेकदा सतावत असेल. त्यासाठी गुगलचा एक ऑप्शन सध्या उपलब्ध आहे.
अशी करा सुरक्षेची खात्री...
- गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन 'snoopsnitch' नावाचं फ्री अॅप डाऊनलोड करा.
- डाऊनलोड झाल्यानंतर हे अॅप ओपन करा... अॅपच्या मुख्य पानावर तुम्ही असाल
- 'click here to test patch level' या ऑप्शनवर क्लिक करा
- यानंतर तुमच्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर आणखी एक विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला 'स्टार्ट टेस्ट' या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता टेस्ट सुरू होईल. यासाठी तुमचं इंटरनेट कनेक्शन सुरू आहे, याची खात्री करून घ्या.
- आता तुम्हाला रिझल्ट दिसेल. पॅच्ड, पॅच मिसिंग, आफ्टर क्लेम्ड पॅच लेव्हल, टेस्ट इन्क्लूझिव्ह अशा भागांमध्ये हा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल.
गुगल नेहमीच आपल्या सुरक्षेची खात्री करून घेत असतो. त्यामुळे, गुगलचे सिक्युरिटी अपडेटस् अनेकदा बदलताना आपल्याला दिसतात. आता, आपला डिव्हाईस सुरक्षित असेल हीच अपेक्षा मोबाईल तयार कंपन्यांकडूनदेखील होतेय.