CoronaVirus : ...म्हणून `या` देशाने २ हजार लोकांना वाटले आयफोन
जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण...
नवी दिल्ली : जपान सरकारने डायमंड क्रूज शिपमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना २ हजार आयफोन दिले आहेत. पण हे आयफोन लोकांच्या मदतीसाठी देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी हे आयफोन देण्यात आले आहेत. या सर्व आयफोनमध्ये सोशल मीडिया ऍप लाईन इन्स्टॉल करण्यात आलं आहे. या ऍपद्वारे लोक डॉक्टरांकडून मेसेजद्वारे, कोरोनापासून वाचण्यासाठी सल्ला घेऊन रोगावर प्रतिबंध करु शकतील.
जपानच्या योकोहामा किनाऱ्यावर डायमंड प्रिंसेस शिपला ५ फेब्रुवारी रोजी वेगळं ठेवण्यात आलं आहे. या जहाजामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आहेत. त्यामुळे या लोकांना किनाऱ्यावरुन खाली उतरु दिले जात नाही.
या जहाजात अनेक देशातील लोक आहेत. नुकतंच ब्रिटनने, या जहाजातील आपल्या देशातील लोकांना बाहेर काढून आपल्या देशात घेऊन जाण्याबाबत सांगितलं होतं. त्याआधी चांगल्या इलाजासाठी अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियानेही या जहाजातून ते आपल्या देशातील लोकांना पुन्हा घेऊन जाण्याबाबत सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका, जपान आपल्या नागरिकांना विमानातून घेऊन गेल्याची माहिती आहे.
काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षणं -
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस रुग्णाला सर्दी, ताप थकवा, सुका खोकला, श्वास घेण्यास समस्या होते. चीन, हाँगकाँग, तायवान, मकाऊ, थायलँड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, व्हियेतनाम, कॅनाडा, नेपाळमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळण्याची माहिती आहे.