मुंबई : महिंद्रा अॅंड महिंद्राने जावा ब्रॅंडला पुन्हा एकदा भारतीय बाजारात उतरवलं आहे. जावा आणि जावा ४२ ला त्याच जुन्या अंदाजमध्ये लॅान्च केलं आहे. तुम्हाला जावाची बाईक बूक करायची असेल, तर ती खालील लिंकवर जाऊन बूक करता येईल. तिसरा मॅाडेल Jawa Perak पुढच्या वर्षी 2019 ला लॅान्च होणार आहे. कंपनीने बाइकची बुकिंग देखील चालू केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला देखील ऑनलाइन बाईक बुक करायची असेल तर jawamotorcycles.com/booking वर बूक केलं जात. तर प्री-बुकिंगची कशी होते पाहा.


अशी होईल तुमची जावा बूलेटची बुकिंग


> https://www.jawamotorcycles.com/booking वर जा
> बुकिंगच्या अगोदर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून रजिस्‍ट्रेशन करावा लागेल 
> त्या वर क्लिक केल्यानंतर शहराचं नाव आणि संबंधित डिलरचा ऑप्‍शन मिळेल, त्याला सिलेक्ट करा.
> येथे तुम्हाला मॅाडेलची निवड करावी लागेल, सोबत कलरच ऑप्‍शन विचारलं जाईल. 
> कंपनीने बाईक 3 कलर मध्ये उतरवली आहे. आवडता रंग निवडा
> येथे आधार कार्डची माहिती मागितली जाईल, आधार अपलोड केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता इत्यादी माहिती भरावी लागेल.
> पुढील क्रिया नावावर क्लिक केल्यावर नवीन विंडो उघडेल
> त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. मग बुकिंग झाल्याचं कन्फर्मेशन येईल.


3 रंगात उपलब्‍ध


जावाला कंपनीने 3 रंगात उपलब्ध केल आहे-ब्लॅक,मरुन, ग्रे.तसेच जावाची 42 को हॅली टील, गॅलेक्टीक ग्रीन, स्टारलाइट ब्लू, ल्युमस लाइम, नेबुला ब्‍ले, कॉमेट रेड-6 रंगाजत लॉन्‍च केली आहे.


काय आहेत फीचर


रशलेनच्या महितीनुसार यात हेडलॅम्प राऊंडेड आहे. 'फ्यूल टॅंक क्रोम फीनिश' आहे. बाईकच इंजीन २९३ सीसी आहे. लिक्विड कूल्‍ड इंजीन २७ एचपी पॉवर देत आहे. शॉक एब्‍जॉर्बर देखील शानदार आहे.


जावा 42 - सर्वात दमदार मॉडल पुढच्या वर्षी होणार लॉन्‍च


जावाचा रोडस्‍टर आणि स्‍क्रॅबलरची आवृत्ती पुढच्या वर्षी होणार लॉन्‍च होणार आहे. यात देखील जुन्या जावाच्या बाईकचा अंदाज पाहायला मिळणार आहे. जावा 42 सर्वात स्वस्त बाईक आहे. याची किंमत 1.55 लाख रुपये असणार आहे. 


तसेच जावाची किंमत 1.64 लाख रुपये असणार आहे. जावा पेरक कस्‍टम बॉबर 1.89 लाख रुपयांना पडणार आहे. या किंमती दिल्‍लीतील एक्सशोरुममधील आहे.