मुंबई : रिलायंस जिओने मार्केटमध्ये पाऊल ठेवताच सर्व कंपन्यांचे धाबे दणाणले. सर्व कंपन्यांपुढे आपले ग्राहक वाचवण्याचं आव्हान समोर आलं. जिओने ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं.


कॅशबॅक ऑफर होणार बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओचे आज लाखो युजर्स आहेत. अशा सर्व युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिलायंस जिओची कॅशबॅक ऑफर २५ नोव्हेंबरला संपणार आहे. रिलायंस जिओ रिचार्जवर 2,599 रुपयांपर्यंतची कॅशबॅक देत आहे. ही कॅशबॅक ऑफर फक्त ऑनलाइन रिचार्जवर मिळत आहे.


400 रुपयांचा मिळतो कॅशबॅक


जर तुम्ही 399 रुपयांचा रिचार्ज करता तर यावर तुम्हाला 400 रुपये कॅशबॅक मिळतात. ही कॅशबॅक 8 वेळा मिळते. 399 च्या रिचार्जनंतर पुढच्या 8 रिचार्जवर 50 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे 399 चा रिचार्ज 349 रुपयांना मिळेल. ऑफरनुसार 399 किंवा त्यापेक्षा अधिक रिचार्जवर 2,599 रुपयांपर्यंतची ऑफर आहे.


वेगवेगळ्या भागात मिळतो कॅशबॅक


2,599 रुपयांच्या कॅशबॅकमध्ये तुम्हाला ही रक्कम एकत्र नाही मिळत. ती वेगवेगळ्या भागात मिळते. जिओ अॅपमध्ये तुम्हाला 400 रुपये मिळतील. 300 रुपये तुम्हाला मोबाईल वॉलेटमध्ये मिळतील. उर्वरीत पैसे शॉपिंग वाउचरमध्ये मिळतील. जर तुम्ही दूसऱ्या डिजिटल वॉलेटमधून रिचार्ज करता तरी तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळेल.