Jioकडून विद्यार्थांसाठी Good News, या नवीन फीचरमुळे अभ्यास करणं आणखी सोपं
स्टडी मोडचा वापरकर्त्यांना खूप उपयोग होईल असा कंपनीचा विश्वास आहे.
मुंबई : सर्वाधीक लोकं सध्या jio टेलिकॉम कंपनीची सेवा घेत आहेत. तसे पाहाता आता एअरटेल आणि Vi देखील आता या बाजारात जोरदार कमबॅक करत आहेत. अशा jio तरी कसा मागे राहाणार. त्यामुळे आपल्या वापरकर्त्यांना एक वेगळा आणि चांगला अनुभव देण्यासाठी jio पुढे आला आहे. जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी आश्चर्यकारक फीचर आणले आहेत. Jio ने आपल्या वेब ब्राउझिंग अॅप Jio Pages मध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. ज्याला स्टडी मोड असे नाव देण्यात आले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे तो खास विद्यार्थ्यांसाठीच बनवण्यात आली आहे.
स्टडी मोडचा वापरकर्त्यांना खूप उपयोग होईल असा कंपनीचा विश्वास आहे. एवढेच नाही, तर कंपनी असेही मानते की, जास्तीत जास्त मुले आता घरूनच शिकत आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस हे एक आव्हान बनत आहे. यासाठी जिओ पेजवर स्टडी मोड जोडण्यात आला आहे.
Study Mode चे फायदे
जिओचे नवीन वैशिष्ट्य Study Mode वापरकर्त्यांसाठी त्याच्या क्लास किंवा इयत्येनुसार त्यांना कंटेन्ट उपलब्ध करते. यामध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या विषयानुसार व्हिडीओ चॅनेलच्या सूचना मिळतात. यासह, हे वापरकर्त्यांना चॅनेल त्यांच्या आवडत्या किंवा फेव्हरेट श्रेणीमध्ये जोडण्याचा पर्याय देखील देत आहे.
या व्यतिरिक्त, येथे Education websiteची लिंक देखील दिले जातात, जेणेकरून वापरकर्ते त्या वेबसाइट्सवर थेट पोहोचू शकतील आणि मुलांचा गुगलवर काहीही शोधण्यात वेळ वाया जाणार नाही.
Jio Pages Study Mode कसे मिळवायचे ते जाणून घ्या
JioPages वर Study Mode वापरण्यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम हे वेब ब्राउझर डाउनलोड करणे आवश्यक आहे.
-डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, ऍप उघडा.
-येथे तुम्हाला मोड निवडण्याचा पर्याय मिळेल
-आपण त्यात स्विच मोड पर्यायावर जाऊन Study Mode सक्रिय करू शकता.
जिओ Jio Set-Top Box सह Jio Pages हे पूर्व-स्थापित आहे. तर इतर अँड्रॉइड टीव्ही वापरकर्ते ते Google Play Store वरून डाउनलोड करू शकतात.
8 भाषांमध्ये उपलब्ध
Jio Pages हा प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी सुरक्षित आहे. याला 8 भारतीय भाषांचे सपोर्ट देण्यात आले आहे. वापरकर्त्यांना या वेब ब्राउझरमध्ये कोणत्याही वेबसाइटच्या लिंक्स सेव्ह करण्याची सुविधा मिळेल. यासह, वापरकर्ते ती लिंक अधिक वेगाने उघडण्यास सक्षम असतील.