Jio New Recharge Plan : सध्याच्या घडीला सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लावणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या हातातला मोबाईल. कारण, दर महिन्याच्या खर्चामध्ये आता (Mobile internet) मोबाईलच्या इंटरनेटचाही समावेश झाला आहे. जिथं अनेक मोबाईल नेटवर्किंग सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या पॅकेजच्या (internet pack) दरांमध्ये वाढ केली आहे, तिथेच जिओकडून (jio) मात्र एका नव्या आणि तितक्याच लक्षवेधी प्लानची घोषणा करण्यात आली आहे. या प्लानअंतर्गत युजर्स त्यांची इंटरनेट सेवा 5G डेटावर अपग्रेड करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला पाहिलं तर, जिओचे जवळपास सर्वच प्लान 5G डेटासोबतच येतात. पण, अजूनही असे काही रिचार्ज पॅक आहेत जिथं युजर्सना फक्त 4जी डेटाच मिळतो. त्यामुळं अशा युजर्ससाठी Jio कडून ही खास भेट आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


डेटा पॅकची किंमत ऐकून उडाल 


100 रुपयांमध्ये आज काय मिळतंय? असा उपरोधिक प्रश्न तुम्हीही करत असाल तर आता तुमच्या या प्रश्नाचं उत्तर थेट जिओनंच दिलं आहे. जिओनं 5G लाँच केल्यानंतर अनेकजण या प्लानची प्रतीक्षा करत होते. सध्या कंपनीनं त्यांच्या चालू प्लान्समध्ये 5G एलिजिबलिटी अॅक्टीव्ह करून दिली आहे. 


सदर पॅकमध्ये युजर्सना 5G डेटा मिळतो. या रिचार्जची किंमत 61 रुपये असून, हा प्लान म्हणजे एक डेटा वाऊचर आहे. यामध्ये तुम्हाला दुसरा कोणताही फायदा मिळत नाही. थोडक्यात सांगावं तर यामध्ये तुम्हाला कोणताही एसएमएस पॅक मिळणार नाही. 


हेसुद्धा वाचा : Apple iPhone 15 Series: iPhone 14 राहू दे आता डायरेक्ट iPhone 15 घ्या; Apple स्वस्त किंमतीत फोन लाँच करणार


 


हा पॅक इतका कमाल आहे की यात तुम्हाला 6GB 5G डेटा मिळेल. तुम्ही 5जी डेटासाठी एलिजिबल असाल. अॅक्टिव्ह वॅलिडीटीपर्यंत हा प्लान काम करेल. या अनोख्या प्लानवजा ऑफरचा फायदा 119, 149, 179, 199 आणि 209 रुपयांवर मिळेल. 


5जी अपग्रेड म्हणजे नेमकं काय? 


5जी अपग्रेड चा नेमका अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. कारण, इथं तुमचं नेटवर्क 5जी मध्ये कनवर्ट होईल असं नाही. पण, जर तुमचा फोन 5 जी आहे आणि तुम्ही अशा परिसरामध्ये राहता जिथं Jio 5G उपलब्ध आहे, तिथं हे नेटवर्क मिळेल.