मुंबई :   रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी योजना सादर केली आहे. धन धना धन ऑफर संपत असल्याने ही नवी ऑफर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओच्या या नवीन योजनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जिओ प्राइम मेंबरशिप असणे आवश्यक आहे. जिओच्या प्रीपेड प्लॅनची सुरुवात १९ रूपयांपासून  ९९९९ रूपयांपर्यंत आहे.


जिओ धन धना धनच्या ऑफरमध्ये सुरूवातीला कंपनीने ३०९ रूपयांच्या रिचार्ज पॅकवर एक महिन्याची वैधता असल्याचे म्हटले होते. आता याच प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळेल आणि ५६ जीबी ४ जी स्पीड डेटा देण्यात येईल. 


दुसरा प्लॅन ३९९ रूपयाचा असेल. याची वैधता ८४ दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी ४ जी स्पीड डेटा मिळेल. तर पोस्टपेड प्लॅनची सुरूवात ३०९ रूपयांपासून होते. याचा सर्वांत महागडा प्लॅन हा ९९९ रूपयांचा आहे.


प्रीपेड प्लॅन


१९ रूपये - एक दिवस वैधता आणि अमर्यादित व्हॉईस कॉल त्याचबरोबर २०० एमबी डेटा 
४९ रूपये - ३ दिवस वैधता आणि अमर्यादित व्हॉईस कॅालिंग , ६०० एमबी डेटा  
९६ रूपये - ७ दिवस वैधता आणि अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एसएमएसची सुविधा. दररोज १ जीबी ४ जी डेटा 
१४९ रूपये - २८ दिवस वैधता आणि अमर्यादित कॉल, ३०० एसएमएस मोफत. २ जीबी ४ जी स्पीड डेटा
३०९ रूपये - ५६ दिवस वैधता आणि अमर्यादित व्हॉईस कॉल. दररोज १ जीबी डेटा.
३४९ रूपये - ५६ दिवस वैधता आणि सर्व सुविधा अमर्यादित शिवाय २० जीबी ४ जी स्पीड,  कोणतीच मर्यादा नाही.
३९९ रूपये -  ८४ दिवस वैधता आणि दररोज १ जीबी ४ जी इंटरनेट. अमर्यादित कॉल आणि एसएमएस सुविधा