मुंबई : Jio युजर्ससाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. Jio च्या अमर्यादित रिचार्ज प्लॅनवर दरवाढीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनंतर, Telco ने त्यांच्या JioPhone योजना देखील बदलल्या आहेत. Jio ने सध्याच्या तीन जिओ फोन प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. Jio ने एक नवीन ऑल-इन-वन प्लॅन देखील लॉन्च केला आहे ज्याची किंमत 152 रुपये आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो,तसेच हा 0.5GB दैनिक डेटा, अमर्यादित कॉल ग्राहकांना देतो. तसेच, तुम्हाला प्लॅनमध्ये 300 मोफत एसएमएस मिळतात, तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio अॅप्सचा मोफत प्रवेश मिळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

JioPhone चे तीन प्लॅन (PLANs) नवीन किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच या तीन ऑल-इन-वन प्लॅनमध्ये आता सुधारणा देखील करण्यात आली आहे.


Jio च्या ऑल-इन-वन प्लॅन ज्याची किंमत 155 रुपये होती, आता तुम्हाला त्यासाठी 186 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनसह, तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल आणि Jio ऍप्सचा मोफत प्रवेश मिळेल.


पुढील रिचार्ज प्लॅन, ज्याची किंमत 186 रुपये होती, ती आता 222 रुपये करण्यात आली आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो आणि या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, 100 SMS आणि Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देखील मिळतो.


पुढील ऑल-इन-वन रिचार्ज प्लॅन ज्याची किंमत 749 रुपये होती ती, आता 899 रुपये आहे. या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच हा प्लान 336 दिवसांसाठी दिल्या जाणाऱ्या प्लॅनचा एकूण 24 जीबी डेटा अॅक्सेस देईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 50 एसएमएस आणि मोफत Jio अॅप्सचा अॅक्सेस उपलब्ध आहे.