नवी दिल्ली : रिलायन्स जियो फोन 2 चा फ्लॅश सेल आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून जियो.कॉमवर कंपनीचा सेल सुरू झालायं. यासोबतच कंपनी 200 रुपयांचे कॅशबॅकदेखील देत आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला पेटीएमने पेमेंट करावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जियो फुल किपॅड (QWERTY)फिचर फोन 2 हजार 999 रुपये किंमतीवर उपलब्ध होतोयं.


रिचार्ज ऑफर  


 हा फोन मुकेश अंबानी यांनी 41 व्या एजीएमध्ये लॉन्च केला होता. 2 हजार 999 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये केवळ रिलायन्स जियो सिम वापरता येणार आहे. कंपनी फिचर फोनसाठी स्पेशल रिचार्ज ऑफर देत आहे. 


खास फिचर्स 


 जिओ फोनसाठी 49 रुपये, 99 रुपये आणि 153 रुपयांचा प्लान सध्या सुरू आहे. या सर्व प्लान्सची वैधता 28 दिवसांची आहे. या फोन 2 मध्ये 2.4 इंच स्क्रीन आणि QWERTY किपॅड आहे. यामध्ये 512 एमबी रॅम असून 4 जीबी पर्यंत स्टोरेज मिळत आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोन स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.